“हम भारत के लोग” या मंचाने घेतली गृहमंत्री मंत्री यांची भेट
मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – सी. ए. ए. CAA विरोधी आंदोलनात झालेल्या कोर्ट केसेस सरकारने मागे घ्याव्यात यासाठी “हम भारत के लोग” या मंचाचे शिष्ठमंडळ कॉ. प्रकाश रेड्डी, फिरोज मिठीबोरवाला,वर्षा विद्या विलास, बिलाल खान, अपर्णा दळवी (JDS), अमोल स. भा. मडामे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. गृहमंत्री यांनी गेटवे ऑफ इंडिया, मुंबई बाग नागपाडा, कोतवाल गार्डन, हुतात्मा चौक आणि इतर सी. ए. ए. (CAA) विरोधी आंदोलनाच्या केसेस मागे घेण्यात येतील असे आश्वासन देखील दिले.







