ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवीभाऊ वैद्य, सिद्धार्थ डी जाधव प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा गृहरक्षक दल संघर्ष समिती यांच्या सूचनेनुसार धीरज पार्सेकर – निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, अमोल माने प्रदेशाध्यक्ष मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जगदाळे, मनोज राणे ठाणे संघटक, सतीश बनसोडे ठाणे जिल्हा अध्यक्ष यांच्या पुढाकाराने कोरोनाशी दोन हात करणारे कोरोना कालखंडामध्ये पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी दिवस-रात्र देश सेवा करत आहे त्यांच्या कार्याची दखल म्हणून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी कोरोना युद्धाने सन्मानित करण्यात आले.

त्यात सर्वप्रथम ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री, श्रीकांत शिंदे, खासदार कल्याण, वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त आयपीएस बाळासाहेब पाटील, एसीपी पालवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक मुलांनी व पोलीस कर्मचारी यांना कोरोणायोद्धाने सन्मानित करण्यात आले हे कोरोणा योद्धा सन्मानित करताना महिला आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट सौ तृप्ती पाटील, सौ प्रबोधिनी कांबळे ,सौ प्रीती खानेकर, सौ मंगल शांताराम कडू सौ छाया शिवाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र वाटप करण्यात आले.







