जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था तसेच श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान कडून आज निवृत्ती नगर परिसरामध्ये स्वर्गीय किसन पुणा नाले यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक मोफत वाचनालय वृत्तपत्र सुरू करण्यात आले.
यावेळी साहस फाऊंडेशनच्या सौ सरिता ललीत कोल्हे, कमल केशव प्रतिष्ठानच्या भारतीताई म्हस्के, एडवोकेट अभिजीत रंधे, मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व नगरसेविका सौ नीता ताई सोनवणे , प्राथमिक शिक्षण उपसंचालक शशिकांत हिंगोणेकर सर,श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान चे अध्यक्ष दीपक भाऊ दाभाडे, आरोग्य दूत पप्पू जगताप, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, अखिल भारतीय शाहू ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष हर्षाली पाटील, चित्र मालपाणी, साहाय्यक फौजदार विश्वास पाटील, साळी समाजाचे अध्यक्ष अशोक साळी, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष साहिल पटेल, दिषा स्पर्धा परीक्षेचे संचालक वासुदेव पाटील, सुबोध क्लासेस सी आर पाटील, पोलीस सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतुल बोंडे, विजय लुले, मानव सेवा शाळेचे कलाशिक्षक दाभाडे सर, अनंत नेवे, सचिन दादा सैंदाणे,, जयेश चौधरी, प्रशांत सुर्वे, यांची उपस्थिती लाभली.







