रात्रीस खेळ चालेफेम सुप्रसिध्द अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला नाट्य चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

actress-apurva-nemalekar

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – “रात्रीस खेळ चाले” मधली शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर. सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा जन्म २७ डिसेंबर १९८८ रोजी मुंबईतील दादर येथे झाला. अपूर्वा दादर भागातच लहानाची मोठी झाली. किंग जॉर्ज विद्यालयातून ती दहावीपर्यंत शिकली व त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमधून महत्वपूर्ण Managament मधील BMS डिग्री घेतली. अपूर्वा नेमळेकर BMS शाखेतील पदवीधर आहे.

अपूर्वा नेमळेकरनं आपल्या करिअरची सुरुवात एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतून केली. ती इव्हेंट प्रमोटर म्हणून काम पाहात असे. इतकेच काय तर तिच्या पहिल्या पगाराचा चेक केवळ १००० रुपयांचा होता.अपूर्वाला अभिनय क्षेत्रात कधीच यातिला नव्हतं. शिक्षण घेताना तिला ग्रॅज्युएशननंतर एमबीए करायचं होतं. परंतु , आपली मुलगी टीव्हीवर दिसावी अशी तिच्या आई-वडिलांची खूप इच्छा होती. ‘अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिले होते’ असं अपूर्वा सांगते.अपूर्वा स्वत: ज्वेलरी डिजाइनर आहे. तिच्या नावाचा इमिटेशन ज्वेलरीचा ब्रँडदेखील आहे.

सर्वात आधी ती आभास हा, या झी मराठीवरील मालिकेमधून सर्वांसमोर आली. तू जीवाला गुंतवावे मधील सौम्या तर आराधना मधील पूजा बनून ती आपल्यासमोर आली. रात्रीस खेळ चाले मधल्या शेवंताने तिला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. दुसऱ्याच्या घरात घुसणारी बाई अस बोल्ड रोल तिने लीलया साकारलेला आहे‌.अण्णा नाईक आणि तीच जमलेलं सुत सगळीकडे चर्चेचा विषय झालेलं आहे. इश्क वाला लव, भाकरखाडी, अन यावर्षी आलेला accidental Prime minister मध्ये सुद्धा तिने काम केलय. अत्यंत मनाचा असा २०१६ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नाट्य परिषद पुरस्कारही तिने प्राप्त केला आहे. २०१४ मध्ये अपुर्वाचे रोहन देशपांडेसोबत लग्न झाले. २७ डिसेंबर रोजी तिला नाट्य चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी , निर्माते , कलाकार , तंत्रज्ञांनी , आणि असंख्य चाहत्यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here