भारतातील सर्वात तरुण महापौर ठरली केरळमधील २१ वर्षांची आर्या राजेंद्रन

aarya-rajendran

तिरुवअनंतपूरम – केरळमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आर्या राजेंद्रन ही २१ वर्षांची तरुणी निवडणूक जिकंली असून महापौर पदासाठीही तिचे नाव निश्चित झाले आहे. भारतातील सर्वात तरुण महापौर होण्याचा मान तिला मिळणार आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील तरुण महापौरांमध्ये तिची गणना होईल. केरळची राजधानी तिरुवअवनंतपूर शहराची महानगपालिका एका तरुणीच्या हातात येत असल्याने तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आर्या कम्युनिस्ट पक्षाकडून (मार्क्सवादी) महानगरपालिका निवडणुकीत उभी राहीली होती. शहरातील मडावनमुकल वार्डातून तिने निवडणुक जिंकली. आर्या सीपीआय पक्षाच्या चिल्ड्रन्स विंगची अध्यक्षही आहे. त्याचबरोबर स्टुटंड फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेची ती सदस्य आहे. महानगरपालिकेचे नेतृत्त्व तरुण नेतृत्त्वाच्या हातात देण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने घेतला. या निर्णयामुळे तरुण पक्षाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील, या उद्देशही पक्षाचा आहे.
यावेळी बोलताना आर्या म्हणाली, माझे वडील सीपीआय पक्षाच्या स्थानिक समितीचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी मला पक्षात येण्यासाठी कधीही सांगितले नाही. डावी विचारसरणी योग्य असल्याची माझी कायमच धारणा राहिली आहे. त्यामुळेच मी पक्षात प्रवेश केला. तिरुवअनंतपूरम शहराचा विकास राजकारण बाजूला ठेवून झाला पाहिजे. मग ते सत्ताधारी असोत, किंवा विरोधक, विकास महत्त्वाचा.

केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये 941 ग्रामपंचायत आणि 14 जिल्हा परिषदांमध्ये सत्तारुढ डाव्या आघाडीने मोठा विजय मिळवला. 10 जिल्हा परिषद, 152 पंचायत समित्यांमध्ये सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएफला विजय मिळाला आहे. तर भाजपने 23 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here