मुंबई (विशेष प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मागील काही दिवसांपासुन पोलीस स्टेशन हददीमध्ये विविध अवैध कृत्यांवर आळा घालण्याचे दृष्टीने कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्यात येत होती आणि बातमीदारांना सूचना दिल्या होत्या.
शुक्रवार दिनांक २५/१२/२०२० रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार याना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, एक इसम घोडबंदर रोडवर आनंदनगर बस स्टॉप जवळ अग्निशस्त्र घेवून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे. सदरची बातमी वरिष्ठांना सांगून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खैरनार यांचे मार्गदर्शनाखाली सापळा लावून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दिनांक २५/१२/२०२० रोजी एका इसमाला घोडबंदर रोड वरील आनंदनगर बस स्टॉप या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव पत्ता : अभिमन्यू रामसागर तिवारी, वय ४४ वर्षे, राह. कॅसरमिल नाका, ठाणे असे सांगितले.
या आरोपीच्या अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा (अग्निशस्त्र) आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याला पोलीस स्टेशन येथे आणून सखोल चौकशी केली असता तो रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून तो डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील सन् २०१८ च्या मोक्का या संघटीत गुन्हेगारी कायद्याखाली नोंद असलेल्या खुनाच्या गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी असून तो सन २०१८ पासून फरार होता.
या आरोपीवर कासारवडवली पोलीस स्टेशन मार्फत अवैध अग्निशस्त्र कब्जात बाळगले बाबत गुन्हा नोंद क्रमांक ३२०/२०२० भारतीय हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३, २५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच या आरोपीवर ठाणे व मुंबई शहरामध्ये सुध्दा मारामारी व जुगार चालविण्याचे ०५ गुन्हे दाखल आहेत.
नमुद कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त.सुरेश कुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग,ठाणे अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड, सहा. पोलीस आयुक्त, वर्तक नगर विभाग पंकज शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते, पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, स.पो.नि. सागर जाधव, स.पो.नि.शहादेव पालवे, पोहवा/५४०८ उदय कोरे, पो.हवा./३७३२ आर.एस.चौधरी, पोना /२४८४ तुषार पाटील, पोना/२४८४ रविंद्र रावते, पोना/२८११ मनोजकुमार पवार, पोना/२२०७ रमेश जाधव, पोना/६९३३ संतोष गायकवाड, पोहवा/६२१७ राजकुमार पाटील, पोहवा/५४४७/सुजित खरात, पोना/३०४३/महेंद्र लिंगाळे, पोना/१२६३/प्रमोद तायडे, पोना/१७८ महापुरे, पोशि/१६३० मनोज महाजन यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक शहादेव पालवे हे करीत आहेत.







