पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा महत्वपूर्ण निर्णय
औरंगाबाद (प्रतिनिधी) – औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील सर्व २३ पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पोलीस चौकी/बिट मध्ये महिला अंमलदार यांची बीट मार्शल म्हणुन नेमणुक करण्यात येणार आहे. जिल्हयात पहिल्यांदाच मोठया प्रमाणावर महिला अंमलदार यांना बिट मार्शल म्हणुन संधी देण्यात येवुन संपुर्ण बिटची जबाबदारी महिला अंमलदारांच्या खांदयावर टाकण्याचा महत्वपुर्ण निर्णय मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक यांनी घेतला आहे.
या अनुषंगाने दि.२४/१२/२०२० रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ३७ महिला अंमलदार यांना बिट अंमलदार म्हणुन कर्तव्याचे दृष्टीने प्रशिक्षीत करण्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ज्याद्वारे महिला अंमलदार यांना प्रत्यक्षात बिट/चौकी सांभाळतांना येणा-या अडचणीना कश्या प्रकारे सामोरे जावे, नागरिकांशी समन्वय राखणे, यासह गुन्हे तपास, अर्ज चौकशी, कायदेविषयक माहिती असे महत्वपुर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले आहे. महिला अंमलदार यांना प्रत्यक्षात बिट अंमलदार म्हणुन कर्तव्य करण्यास मिळणार असल्याने महिला अंमलदार याचे मध्ये आत्मविश्वासासह, उत्साह द्विगुणीत झालेला दिसुन आला आहे. पोलीस अधीक्षक यांनी घेतलेला या निर्णयाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त करत त्यांना मिळणारी नविन जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याचे सर्वांनी आधासित केले आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक यांनी महिला अंमलदार यांचेशी संवाद साधत त्यांना देण्यात येणारी बिट अंमलदार (मार्शल) याची जबाबदारी संपुर्ण क्षमतेने घेवुन काम करणे बाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हयात पहिलांदाच मोठया प्रमाणावर महिला अंमलदारांची नेमणुक करण्यात येत असुन कोणत्याही महिला अंमलदारास कर्तव्याचे अनुषंगाने अडचणी आल्यास तात्काळ संपर्क साधवा. त्याचे पाठीशी भक्कम पणे उभे असल्याचे सांगून सर्व महिला अंमलदार याचेमध्ये भरिव आत्मविश्वास निर्माण केला. तसेच या प्रशिक्षणाद्वारे आपल्यातील कौशल्य तसेच कर्तव्याप्रती प्रोफेशनल दृष्टीकोन वाढविणे गरजेचे असल्याचे नमुद केले आहे.








