मृत सैनिकाचा देह घेऊन जाणाऱे पाकिस्तानी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, चौघांचा मृत्यू

pakistan-helicopter-file-photo

इस्लामाबाद – पाकिस्तानात लष्कराचे एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. शनिवारी हे हेलिकॉप्टर गिलगिट-बाल्टिस्तान भागात कोसळले. चौघांचा या अपघातात मृत्यू झाला, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली. एका मृत सैनिकाचा मृतदेह लष्करी रुग्णालयाकडे नेत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे हे हेलिकॉप्टर कोसळले. आयएसपीआरच्या स्टेटमेंटमध्ये हे म्हटले आहे.

दोन सैनिकांसह मेजर रँकचा वैमानिक आणि सह वैमानिक या अपघातात ठार झाले. हेलिकॉप्टर ज्या भागात कोसळले, त्या ठिकाणी जमिनीवर कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. आयएएनएसने हे वृत्त दिले आहे.

दुर्गम भागात ज्या ठिकाणी मानवी वस्ती नाहीय, अशा ठिकाणी हा अपघात झाला असे सूत्रांनी शिन्हुआ वृत्त संस्थेला सांगितले. अपघातानंतर लष्करी टीम्स घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी तिथून पाच मृतदेह ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here