निमगाव (यावल) येथील धर्मप्रेमी ग्रामस्थांनी गावातून ३१ डिसेंबरची विकृती हद्दपार करण्याचा निर्धार केल्याचा ठराव

nimgaon-yawal
  • हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबरच्या अपप्रकारांविरोधात जळगाव जिल्ह्यात जनजागृतीपर अभियान   
  • यापुढे गावात 31 डिसेंम्बर साजरा न करण्याचा निमगाव (ता. यावल) येथील धर्मप्रेमी ग्रामस्थांचा निर्धार !

जळगाव (विशेष प्रतिनिधी) – ३१ डिसेंबर निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात जनजागृतीपर अभियान राबवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून निमगाव (यावल) येथील धर्मप्रेमी ग्रामस्थांनी गावातून ३१ डिसेंबरची विकृती हद्दपार करण्याचा निर्धार केला.

समिती गेल्या १८ वर्षांपासून इंग्रजी नववर्षानिमित्त होणाऱ्या अपप्रकरांविरोधात जागृती करत आहे. समिती ही सेवाभावी संस्था असून समिती राष्ट्ररक्षण, धर्मजागृती तसेच सार्वजनिक उत्सवांत होणारे अपप्रकार रोखणे, राष्ट्रध्वज तसेच देवतांची विटंबना थांबवणे अशा विविध विषयांमध्ये गेली १८ वर्षे जनजागृती करत आहे. तसेच अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलिस यांना साहाय्य करते.३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात मद्य आणि अंमली पदार्थांचे सेवन केले जाते. तसेच रात्री मद्य पिऊन वाहने भरधाव वेगाने चालवणे, रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके वाजवून ध्वनीप्रदूषण करणे, अश्लील अंगविक्षेप करून नाचणे, मुलींची छेड काढणे, विनयभंग, बलात्कार आदी कृत्य करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रकार सर्रास घडतांना दिसतात.

समितीच्या वतीने जिल्ह्यात चोपडा, जळगाव, भुसावळ, यावल, धरणगाव, एरंडोल येथे ऑनलाईन बैठका आणि प्रवचने घेऊन जागृती करण्यात आली. तसेच यावल, धरणगाव, पाळधी, अमळनेर, एरंडोल, चोपडा, सावदा, वरणगाव येथील पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मागील वर्षी खर्ची (एरंडोल) येथील ग्रामस्थानीही ग्रामपंचायतीद्वारे गावात ‘३१ डिसेंबर’ साजरे न करण्याविषयी ठराव पारित केला होता. तशीच अभिनंदनीय कृती यावर्षी निमगाव ग्रामस्थानी केली आहे. अन्य गावातील हिंदूंनीही याचा आदर्श घेऊन पाश्चात्य संस्कृतीला हद्दपार करून हिंदु धर्मानुसार आचरण करण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here