आम्हाला खड्ड्यात गाडल्यावरच..रस्त्यांचे डांबरीकरण करणार का ?

raver-road

रावेर यावल तालुक्याच्या जनतेमधे संतापाची व नाराजीची लाट

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी)- रावेर व यावल तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्यांना उतरती कळा लागल्याने हे रसते खड्ड्यात गेले आहेत.ह्या रस्त्यांचा संपुर्ण प्रकार बांधकाम विभागाचे अधिकारी व आमदार खासदार यांना माहिती असल्यावरही कुंभकर्णाच्या झोपेत आहेत की काय?कोरोनाचे संकट सांगुन करताहेत टाळाटाळ.आणि रस्त्यांच्या कामांबाबतीत वेळ मारुन देण्याचे काम माञ प्रगतीपथावर दिसत आहे. या संबधित बांधकाम खात्याच्या अधिकारी पदाधिकारी यांना रस्त्यांच्या डांबरीकरणाचा मुहुर्त काही सापडत नाही.असे चिञ सद्ध्या परिस्थितीत दिसायला मिळत आहे.

त्याचबरोबर रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे अजुन गुलदस्त्यात दिसत आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की रावेर यावल तालुक्यातील ,लोहारा ते कुसूंबा मार्गावरील १ किलोमीटरचा रस्ता देखील शेवटची घटका मोजत आहे.तसेच जानोरी ते मोहंमांडी बोरघाट फाटापर्यंतचा रस्ता सुद्धा अतिशय खराब झालेला आहे.खिरोदा ते कळमोदा,लोहारा ते सावखेडा,उटखेडा ते चिनावल,खिरोदा ते फैजपुर अशा अनेक रस्त्यांची दुर्दशा बघुन अक्षरशः डोळ्यात अश्रु यायला वेळ लागत नाही,जसे शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांचीच अशी दुरावस्था आहे, तर आदिवासी गावांच्या रस्त्यांचे काय हाल असतील जरा विचार करा हो साहेब,काय ऑफिसांमधील हवा खात आहेत ,थोडीसी ग्रामीण आदिवासी गावांची पण हवा पहा,तेव्हा तुम्हाला दिसेल खरोखरचा रस्ता खराब झालेल्यांचा नकाशा.ह्या संबधित गावांच्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन या प्रवास करीत असतांना वाहन धारकांना तारेवारची कसरत करुन प्रवास करावा लागत आहे..व हे रस्ते अपघातांना कारणीभुत ठरत आहेत.आणि केव्हा केव्हा तर या रस्त्यांनी प्रवास करीत असता डोके फोडले जात असुन अनेक वाहन धारकांना दवाखान्यांचा पायऱ्या चढण्याच्या देखील अनेक घटना घडतांना दिसत आहेत.

या अशा घटनांना जबाबदार कोण बेजबाबदार अधिकारी की पदाधिकारी लोकप्रतिनिधी असा सवाल उपस्थित झाला आहे.आणि हा प्रकार कुठपर्यंत चालणार?असे देखील रावेर यावल तालुक्याच्या जनते कडुन बोलले जात आहे.आणि ह्या जनतेकडुन असेही बोलले जात आहे की,आम्हाला खड्ड्यात गाडल्यावरच रस्त्यांचे डांबरीकरण करणार का?तरी या संपुर्ण रस्त्यांच्या दयनीय अवस्थांचा विचार करुन तात्काळ योग्य तो निर्णय घेऊन संबधित रस्त्यांचे डांबरीकरण करावे अशी रावेर यावल तालुक्याच्या जनतेकडुन,शेतकऱ्यांकडुन,मजुरांकडुन,विविध संघटनांकडुन या वृत्तपञाद्वारे संबधित वरिष्ठ अधिकारी,आमदार,खासदार,यांचेकडे रास्त स्वरुपाची मागणी करण्यात आली आहे..पाहुया या रस्त्यांबाबतीत संबधित वरिष्ठ अधिकारी वआमदार,खासदार व बांधकाम मंञी यांचेकडुन योग्य पाऊल उचलले जाते किंवा नाही ? याकडे माञ रावेर यावल तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागुन आहे…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here