बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – वेल्हे (पुणे) येथील पाली या राजमार्गावरुन गेल्यावर पाली दरवाजा बुरुजात अनेक वर्षांपूर्वी पासुन लपलेला चोर दरवाजा दगड मातीने बुजलेला होता. सह्याद्री प्रतिष्ठान ग्रुप किल्ल्यावर पर्यटनासाठी आला होता यावेळी निर्देशनास आल्यावर हा दरवाजा पुर्ववत खुला करण्यात आल्याचे माहीती सह्याद्री प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष त्श्रमिक गोजमगुंडे यानी दिली.
सर्व गडाचा राजा व राज्याचा गड राजगड रयतेचा स्वराज्य स्थापना करुन स्वराज्याचा सर्वाधिक काळ राजधानी राहिलेला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वाधिक सहवास लाभलेल्या राजगड परिसरातील आजही शिवकालीन वस्तू व वास्तू चे दर्शन होत असल्याने राजगडावर पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे हजारो पर्यटक शिवप्रेमी संघटना किल्ल्यावर येत असतात त्यापैकी एक सह्याद्री प्रतिष्ठानचा ग्रुप नुसता राजगडावर आला होता. पाली दरवाजा बुरुज परिसरातील फिरत असताना बुरुजावर दगड दिसले व माती बाजूला केल्यास एक चोर दरवाजा दिसला राजगडाच्या पाली दरवाजाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या बुरुजात असलेला चोर दरवाजा काळाच्या ओघात बुजला होता.







