प्रहार जनशक्ती पक्षाच्या बैठकीत निर्णय
जळगांव (संपादक सुनिल पाटील) केंद्र शासनाने पारित केलेले अन्याय कारक तीन कृषी विधेयक मागे घेण्यात यावे .या सह दिव्यांगांच्या हक्क व अधिकार तसेच स्थानिक प्रश्नांवर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार मा .ना . बच्चूभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाच्या जळगाव महानगर युवक आघाडीच्या बैठकीत करण्यात आला.
पदमालय शासकीय विश्राम गृह येथे युवा आघाडीचे महानगर अध्यक्ष -निलेश बोरा यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 27 डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .बैठकीच्या सुरुवातीला बैठकीत शहीद जवान व शहीद झालेल्या आंदोलन करत्या शेतकरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीत दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा व्यक्त करण्यात आला. केंद्र शासनाने पारित केलेले अन्यायकारक तीन कृषी विधेयक मागे घेण्यात यावे ,कामगार विरोधी भूमिका सोडून केंद्र सरकारने कामगारांच्या हिताचे धोरण राबवावे, दिव्यांगांच्या कल्याणाकरीता महानगरपालिका व स्थानिक पंस ,ग्रापं, जिल्हा परिषदा, नगरपरिषद यांचे कडून राखून ठेवला जाणाऱ्या निधीचा कोणताही विनियोग केला जात नसल्याने सुविधांपासून दिव्यांग वंचित राहत आहेत.या निधीचा येत्या २६जानेवारी २०२१प्रजासत्ताक दिनापर्यंत वापर न झाल्यास अत्यंत आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.या सह जळगांव शहरातील अमृत योजना व भुयारी गटारींच्या कामाच्या दर्जाची गुणवत्ता नियंत्रण पथकाव्दारे तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.
जळगांव महानगर पालिकेत दिव्यांग असलेल्यांची परिपूर्ण यादी नसून निधी राखून ठेवला जात असला तरी खर्च केला जात नसल्याचे बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दिव्यांगांचे सर्वेक्षण करून त्यांना दिव्यांग निधी अंतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांगांनी पक्षाचे – सागर गोल्ला (गवळी) – उपाध्यक्ष-मो९४०३५७७४८५; हरीष कुमावत – उपाध्यक्ष -मो ८४८३८२८०८९ लक्ष्मण पाटील संघटक -९५९५०७०४९२ यांचेशी दिव्यांग प्रमाणपत्र ,आधारकार्ड, रेंशनकार्ड ,२ पासपोर्ट फोटो यांचे कडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
बैठकीत प्रत्येक प्रभागात शाखा विस्तार करण्यासाठी मोहिम राबविण्याचा ईरादा व्यक्त करून प्रभाग तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीत -निलेश बोरा -अध्यक्ष -प्रहार जनशक्ती पक्ष युवा आघाडी , सागर गोल्ला ( गवळी ) -उपाध्यक्ष , हरीष कुमावत – उपाध्यक्ष, अनिल नाईक -चिटनीस , जितेंद्र वाणी -सहचिटनीस , लक्ष्मण पाटील – संघटक , धनंजय आढाव -सहसंघटक ,स्वप्निल शेळके , अनिल बिऱ्हाडे , किरण रुले, राजेश खडके ,जब्बार शेख , इरफान सैय्यद, अमोल विसपूते,जितेंद्र पाटील यांच्या सह कार्यकर्ते आदी उपस्थित होते.







