मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्याच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी खूप महत्त्वाची भूमिका घेऊन स्वतः ची काळजी घेत जनसेवा करून कर्तव्य पार पाडले आहे. त्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी खूप गोष्टी नियंत्रणात आणल्या. खूप कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले तर काही मृत्युमुखी पडले, याच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ‘ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत’ व ‘मेडलाईफ फाऊंडेशन’ संयुक्त विद्यमाने पोलिसांसाठी मोफत हेल्थ चेकअप बदलापूर पोलीस स्टेशन पूर्व येथे रविवार, दिनांक २७ डिसेंबर ला सकाळी १० वाजता सुरू होऊन सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा कॅम्प घेण्यात आला होता.
खूप कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला तर ‘युवा संघर्ष संस्थेच्या’ वतीने संचालक डॉ. भूषण शाक्यविर व मेडलाइफ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष : आयु. भूषण शिरोडे सर्व पोलीस संघटना टीमला संविधानाची प्रास्ताविका देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोंगळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष धमेंद्र अगरवाल, महाराष्ट्र अध्यक्ष अनंत हुमने, उपाध्यक्ष दाजीसाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश सहसचिव विनायक जयकर, अंबरनाथ अध्यक्ष संतोष क्षेत्रे, अंबरनाथ सदस्य नवणात रसाळ तसेच पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती. तर युवा संघर्ष संस्थेच्या वतीने पाटण भूषण आयु. दयानंद जगताप संस्थेचे अध्यक्ष आयु. निलेश रोकडे, आयु.अमोल जगधनी यांनी सहभाग घेतला.







