महिला सैन्यभरती मार्गदर्शन शिबीर संपन्न

girl-military-training

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – भारतीय सैन्यात महिला पोलीस याची भरती  करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्या मुले 10 वी पास असलेल्याना संधी मिळणार असल्याने आम्हा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे उद्घाटन प्रसंगी परमानंद आश्रमाचे कार्याध्यक्ष उदय पाटील यांनी सांगितले.

व्यासपीठावर कार्यक्रम अध्यक्ष रायगड भूषण जयपाल पाटील,परमानंद ट्रस्ट चे अध्यक्ष कृश्नकांत पाटील, उदय पाटील,प्राचार्य नरेश मोकल उपस्थित होते.

प्रारंभी आलेल्या मुलीची व सोबतीची तापमान ,मास्क,कागदपत्रे ची तपासणी ट्रस्ट चे सांस्कृतिक कमिटी सदस्य अरुण पाटील यांनी केली,ग्राउंड धावणे,उंच उडी,लांब उडी,परीक्षा पीटी चे प्राचार्य नरेश मोकल यांनी घेतली.यावेळी अध्यक्ष जयपाल पाटील यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यातील पेंण, खालापूर, महाड,उरण,पनवेल व अलिबाग मधील 30 महिला आल्या होत्या त्यापैकी21 मुलीची निवड होऊन त्याचे निवासी प्रशिक्षण 30 जानेवारी 2020 ते 5 जानेवारी 2021 पर्यन्त होणार असून त्यानी पेण च्या  तहसीलदार डॉ, अरुणा जाधव याचे आभार मानले,शिबिर कोविड19 नियमाचे पालन करण्यासाठी  सचिव नरेंद्र पाटील,खजिनदार जनार्दन पाटील,सदस्य अरुण पाटील यांनी सहकार्य केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here