खरजे – जानकर युवा नेत्यांनी आटपाडी खानापूर तालुक्याचा नावलौकीक राज्यभर वाढवावा – आनंदरावबापु पाटील

atpadi

आटपाडी (प्रतिनिधी) – प्रा . एन . पी . खरजे – राजू जानकर या युवा नेत्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश पदांच्या माध्यमातून सर्वदूर ख्यातकीर्त असलेल्या आटपाडी खानापूर तालुक्याचा नावलौकीक राज्यभर वाढवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते, माणगंगा उदयोग समुहाचे प्रणेते आनंदरावबापु पाटील यांनी केले आहे .

राष्ट्रवादी युवक कॉग्रेस च्या प्रदेश सचिवपदी प्रा . एन . पी . खरजे विभूतवाडी ( आटपाडी ) आणि प्रदेश सरचिटणीस पदी राजू जानकर भेंडवडे ( खानापूर ) यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आटपाडीत सत्कार करणेत आला . त्यावेळी आनंदरावबापु पाटील बोलत होते . प्रारंभी खरजे – जानकर या युवा नेत्यांचा आनंदरावबापू पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा बांधुन सत्कार करणेत आला .atpadi-satkar

आटपाडी खानापूर तालुक्यात युवकांची प्रचंड संख्येची अभेद्य फळी उभी करताना प्रामाणीक, कष्टाळू ,धाडसी आणि जिगरबाज तरुणांच्या पाठीशी उभे रहात सर्व जाती ,जमाती, भिन्न धर्मीय युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य चेहरा बनवण्यात खरजे जानकरांनी आपले कसब पणाला लावावे असेही आनंदरावबापू पाटील यांनी स्पष्ट केले .

आटपाडी ,खानापूर तालुक्याच्या ७० वर्षाच्या राजकीय इतिहासात युवक काँग्रेसचा प्रदेश पातळीवर पदाधिकारी होण्याचा बहुमान मिळविणारे प्रा . एन .पी . खरजे, राजू जानकर हे पहिले युवा नेते असल्याचे स्पष्ट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी ना . जयंतराव पाटील साहेबांच्या आशिर्वादाने आणि माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या समर्थनाने खरजे – जानकर यांच्या निवडीद्वारे उपेक्षित तालुके आणि बहुजन समाज घटकांचा अप्रत्यक्षरित्या मोठा सन्मान केल्याची भावना सादिक खाटीक यांनी बोलून दाखविली .

प्रदेश वरील पदांच्या माध्यमातून राज्यभर युवकांचे मजबुत संघटन करूच तथापि युवा शक्तीच्या माध्यमातून आटपाडी – खानापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावात उभा करीत ना . जयंतराव पाटील साहेब, माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील ,युवा नेते वैभवदादा पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष वरपे यांचा विश्वास सार्थ ठरवू असे सत्काराला उत्तर देताना प्रा . एन .पी . खरजे आणि राजू जानकर यांनी बोलून दाखविले .

यावेळी आटपाडी तलुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी आटपाडी तालुका अध्यक्ष अमित ऐवळे, उत्कर्ष बाड , आशीश कांबळे , विशाल यादव , योगेश सरगर, अमोल माने ,नवनाथ जाधव ,सचिन मिसाळ, डॉ. वाघमारे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here