शहादा येथे भूकंपाचे सौम्य धक्के

richter-scale

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी, जयनगर परिसरात काल रात्री दीड वाजेच्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. धक्क्यांची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल नोंदविण्यात आली.

शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये काल रात्री एक वाजून 24 मिनिटांनी 3.2 रिश्टर स्केल तर एक वाजून 26 मिनिटांनी 2.6 रिश्टर स्केलं एवढ्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने यात कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू मध्यप्रदेशातील शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात असल्याची माहिती सावळदा येथील भूकंपमापक अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here