मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी तरुणी घरातून पळाली

jaipur-gay-marriage

जयपूर – राजस्थानातील जयपूरवरून पळालेल्या एका तरुणीच्या शोधासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्न केले. ही तरुणी मुंबईमध्ये सापडली असून तिच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक बाब समजली आहे. जयपूरमधून पळालेल्या तरुणीचे वय 20 वर्ष असून तिने मुंबईत येऊन लग्न केल्याचं पोलिसांना कळालं आहे. तिने पुरुषाशी लग्न केलं नसून एका तरुणीशी लग्न केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.

जवळपास वर्षभरापूर्वी जयपूरमधील निशाची (बदललेले नाव) मुंबईतल्या अरुणाशी (बदललेले नाव) फेसबुकवरून मैत्री झाली होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघींनी लग्न करायचं ठरवलं. निशा अचानक बेपत्ता झाली , ज्यामुळे तिच्या घरच्यांनी पोलिसांत ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर ती मुंबईला असल्याचं कळालं. तिचा ठावठिकाणा शोधून काढत ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक मुंबईत आलं होतं.

पोलिसांनी निशाला शोधून काढलं आणि चौकशी केली. यावेळी तिने सांगितलं की ती सज्ञान असून स्वत:च्या मर्जीने घर सोडून आली आहे. पोलिसांसोबत निशाचा भाऊ देखील होता. निशाच्या भावाने तिला बरंच समजावलं ज्यानंतर ती जयपूरच्या घरी परतण्यास तयार झाली. मात्र जयपूरला परतण्यासाठी तिने भावासमोर एक अट घातली होती. निशाने सांगितलं की जयपूरला जायचं असेल तर अरुणाही तिच्यासोबत येईल. ही अट तिच्या भावाने मान्य केल्याने निशा आणि अरुणा दोघीजणी जयपूरला रवाना झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here