लंडनमध्ये उपचार घेत असलेले नवाझ शरीफ यांचा पासपोर्ट होणार रद्द

navaz-sharif

इस्लामाबाद – पाकिस्तानी न्यायालयाच्या अनेक समन्सनाही दाद न देता मायदेशी परतण्यास नकार देणारे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मोठा झटका देणारा निर्णय पाकच्या इम्रान सरकारने घेतला आहे. नवाझ यांचा राजनैतिक पासपोर्ट (रेड पासपोर्ट) आणि व्हिसा 16 फेब्रुवारीला रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतल्याची माहिती पाकचे गृहमंत्री शेख राशिद अहमद यांनी दिली.

नवाज शरीफ नोव्हेंबर 2019 पासून इस्लामाबाद – पाकिस्तानी न्यायालयाच्या अनेक समन्सनाही दाद न देता मायदेशी परतण्यास नकार देणारे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मोठा झटका देणारा निर्णय पाकच्या इम्रान सरकारने घेतला आहे. नवाझ यांचा राजनैतिक पासपोर्ट (रेड पासपोर्ट) आणि व्हिसा 16 फेब्रुवारीला रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतल्याची माहिती पाकचे गृहमंत्री शेख राशिद अहमद यांनी दिली.

नवाज शरीफ नोव्हेंबर 2019 पासून लंडनमध्ये आहेत. त्यांना न्यायालयाने गंभीर आजारासाठी इंग्लंडला जाण्याची परवानगी दिली होती. पण त्यानंतर न्यायालयात हजार राहण्याचे अनेक समन्स काढूनही ते मायदेशी न परतल्याने त्यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने फरार घोषित केले होते. पाकिस्तान सरकारने नवाझ यांचा पासपोर्ट आणि व्हिसा रद्द केल्यास त्यांना लंडनमध्ये राहता येणार नाही. त्यामुळे हा निर्णय नवाझ यांच्यासाठी जबर झटकाच मानला जात आहे.आहेत. त्यांना न्यायालयाने गंभीर आजारासाठी इंग्लंडला जाण्याची परवानगी दिली होती. पण त्यानंतर न्यायालयात हजार राहण्याचे अनेक समन्स काढूनही ते मायदेशी न परतल्याने त्यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने फरार घोषित केले होते. पाकिस्तान सरकारने नवाझ यांचा पासपोर्ट आणि व्हिसा रद्द केल्यास त्यांना लंडनमध्ये राहता येणार नाही. त्यामुळे हा निर्णय नवाझ यांच्यासाठी जबर झटकाच मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here