पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड; जाळपोळ करणारे 26 कट्टरतावादी अटकेत

islamabad

इस्लामाबाद – पाकिस्तानात अल्पसंख्य हिंदूंच्या मंदिराची तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या 26 कट्टरतावाद्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या खैबर पख्तुन्वा प्रांतातच इस्लामी कट्टरतावाद्यांनी हिंदू मंदिराची तोडफोड करीत ते पेटवून दिले होते.

पोलिसांनी खैबर पख्तुन्वा प्रांतातील मंदिराच्या तोडफोडीप्रकरणी कट्टरपंथी जमियत उलेमा-ए-इस्लाम पार्टीचे नेते रहमत सलाम खटकसहित 26 लोकांना अटक करण्यात आली आहे. हिंदू मंदिरावर याच लोकांनी भीषण हल्ला केल्याची तक्रार हिंदू नागरिकांनी केली होती. मात्र मानवाधिकार संघटनांनी या हल्ल्याविरोधात आवाज उठवल्यावर आता उद्ध्वस्त मंदिराचा जीर्णोध्दार केला जात आहे. या हल्ल्याची खैबर पख्तुन्वा प्रांताचे मुख्यमंत्री महमूद खान त्यांच्यासह हिंदू आणि मुस्लिम संघटनांनी निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here