नाक छोटे करण्याच्या नादात तरुणीने गमावले दोन्ही पाय

turkey

तुर्कस्तान – अभिनेत्रींसह अनेक महिला सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करताना दिसतात. मात्र अनेकदा सौंदर्याचा हव्यास अंगाशी येतो. असाच काहीसा प्रकार तुर्कीमधील एका महिलेसोबत झाला आणि नाक छोटे करण्याच्या नादात तिने आपले दोन्ही पाय कायमचे गमावले.

मिडिया रिपोर्टनुसार, सेविंक सेक्लिक असे या 25 वर्षीय महिलेचे नाव आहे. तिने इस्तांबूलमधील एका नामांकित खासगी ‘प्लास्टिक सर्जरी क्लिनिक’मध्ये नाक छोटे करण्याची शस्त्रक्रिया केली होती. मात्र यामुळे आपण कायमचे अधू होऊ असेही तिला वाटले नसेल.

शस्त्रक्रिया झालेल्यानंतर सेविंक सेक्लिक हिला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. तोपर्यंत सर्व काही ठिक होते. मात्र घरी गेल्यानंतर तिला प्रचंड ताप आला. याबाबत तिने डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व काही ठिक असल्याचे सांगितले. मात्र ताप वाढत गेल्याने एक आठवड्याने ती पुन्हा त्याच रुग्णालयात दाखल झाली. मात्र शस्त्रक्रिया करताना उपस्थित असणाऱ्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना हटवण्यात आल्याची माहिती तिला मिळाली.
रुग्णालयात तिची तपासणी करण्यात आली तेव्हा डॉक्टरांनी तिला सर्व काही नॉर्मल असल्याचे आणि घाबरण्याचे काही कारण नसल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेनंतर अशी लक्षणे दिसतात असेही डॉक्टरांनी सांगितले. मात्र डॉक्टरांच्या आश्वासनानंतरही तिची तब्येत ढासळू लागली.

याबाबत बोलताना सेविंक सेक्लिकच्या भावाने सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर बहिणीची जेवणावरील वासणा उडाली. ती सतत आजारी पडू लागली. तिच्या पायांचा रंग काळा पडला होता. परिस्थिती आणखी बिकट झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या पायात ब्लड पॉयझनिंग झाल्याचे सांगितले. तिचे पाय कापण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय समोर नसल्याचे त्यांनी सांगितले आणि आमच्या कुटुंबावर आभाळ कोसळले. अखेर तिचा जीव वाचवण्यासाठी दोन्ही पाय कापण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here