सुवर्ण जयंती वर्षानिमित्ताने संपूर्ण देशात सहजयोग ध्यान  आँनलाईन व्हर्च्युअल प्रशिक्षण शिबिराचे विनामूल्य आयोजन

nirmala-devi

श्री माताजी निर्मलादेवी  सहजयोग-ध्यान ट्रस्टचा उपक्रम : रायगड जिल्हा समन्वयक शिवाजी देशमुख यांची माहिती

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) –  दि. ३ जाने.रविवार रोजी नववर्षा निमित्ताने सकाळी ९.००वा पासून रात्री ९.००वा. पर्यंत आँनलाईन व्हर्च्युअल फेसबुक आणि युट्युब च्या माध्यमातून श्री माताजी निर्मला देवी सहजयोग ट्रस्ट द्वारे  राष्ट्रीय सहजयोग ट्रस्ट , नवी दिल्ली व सहजयोग प्रतिष्ठान, पुणे द्वारे सहजयोग  सुवर्ण जयंती उत्सव निमित्त संपूर्ण देशभरामध्ये 16 विविध भारतीय भाषांमध्ये सलग 12 तास ऑनलाईन  कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्काराच्या अनुभूतीचा  कार्यक्रमाचे निशुःल्क प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले  आहे. प्रत्येक सत्र हे 45 मिनिटांचे असून सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सलग 16 भाषांमध्ये सहजयोग ध्यान शिकवले जाणार आहे.

सहजयोग रायगड जिल्हा समन्वयक श्री. शिवाजी देशमुख  यांनी सांगितले की,दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या ऑनलाइन ध्यान साधनेच्या कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्काराची अनुभूती या  कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा  कार्यक्रमाचे आयोजन हिंदीत सकाळी ९.४५ वा. ते १०.३० वा. तसेच मराठीत सायंकाळी ५.१५ ते ६.००वा. असणार आहे.

“सर्व धर्माचे सार-आत्मसाक्षात्कार” हा भारतीय अध्यात्मिक वारसा श्री माताजी निर्मलादेवी यांनी अविरत पणे ५० वर्षात सर्व देशांमध्ये पोचविला .प्रथम सत्र देववाणी संस्कृत भाषेमध्ये असेल ,त्यानंतर हिंदी, बंगाली , तेलगू,तामिळ, गुजराती,कन्नड , मल्याळम , पंजाबी, भोजपुरी, आसामी , मराठी, ओडिया , मैथिली, इंग्रजी आणि सिंधी असे एकूण 16 भाषांमध्ये संपूर्ण भारत देशातील साधक www.sahajayoga.org.in या वेबसाईटवर वर आणि learningsahajayoga या युट्युब चॅनेल वर सहजयोगध्यान साधनेचा अनुभव घेऊ शकतील.

सहजयोग नॅशनल ट्रस्ट ,नवी दिल्ली चे उपाध्यक्ष श्री दिनेश रॉय यांनी वरील माहिती देताना सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात सकाळ-संध्याकाळ ऑनलाइन ध्यानामध्ये शास्त्रीय संगीत व भजन तसेच नवीन साधकांसाठी ध्यान कार्यक्रम व ध्यानामधील गहनता येण्यासाठी नियोजित केलेल्या कार्यशाळेत देश-विदेशातील लाखो साधकांनी ऑनलाईन सहभागी होऊन ध्यान प्रक्रियेचा लाभ घ्यावा.  ग्लोबल रेकॉर्डस ऍण्ड रिसर्च फाऊंडेशन (GRRF) द्वारा सहजयोग संस्था आशिया खंडातील सर्वात जास्त सामूहिकतेत ध्यान करून घेणारी संस्था आणि ऑनलाईन मेडिटेशन घेणारी सर्वात मोठी संस्था या नावाने पुरस्कार देण्यात आले आहे.

learningsahajayoga या युट्युब चॅनेल वर दररोज सायंकाळी ५ वाजता मराठी -हिंदी भाषेत सहजयोग प्रशिक्षण हा ६ आठवड्याचा कोर्स राबविला जातो. सहजयोग ध्यान साधना संपूर्णपणे विनामूल्य आहे.  सर्व वयोगटातील लोकांसाठी अत्यंत सरळ व सोपी असून दैनंदिन १० मिनिट ध्यानाने प्रत्येक व्यक्ती  आपल्या मध्ये परिवर्तन घडल्याचा अनुभव घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दैनंदिन कामात ऊर्जा , मानसिक  सुरक्षा आणि रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी सहजयोग ध्यान अत्यंत प्रभावी आहे. या कार्यक्रमाची माहिती संपूर्णतः निशुल्क टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1800  2700 800 यावर उपलब्ध आहे अशी माहिती सहजयोग महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री स्वप्नील धायडे यांनी माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here