नववर्षानिमित्त शिक्षकांनी गरजूंना ब्लॅंकेट्स वाटप करून घातले मायेचे पांघरूण

vardha-shikshak-samiti

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नविन वर्षाचे औचित्य साधून वर्धा येथील रेल्वे स्टेशन परिसर, बस स्थानक परिसर, साईमंदिर परिसर, सेवाग्राम रेल्वे स्टेशन परिसर व इतर ठिकाणी या जीवघेण्या थंडीत विनापांघरूण उघडयावर झोपणाऱ्या गरजू लोकांना शिक्षकांच्यावतीने 1 जानेवारी 2021 ला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह महेंद्र सालंकार यांचे नेतृत्वात व प्रा. रितेश निमसडे यांचे मार्गदर्शनात ब्लॅंकेट्स वितरित करून एक सामाजिक बांधीलकी जोपासण्यात आली.

यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे देवळी तालुकाध्यक्ष तथा विजूकटाचे पदाधिकारी प्रा. रितेश निमसडे, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे वर्धा तालुकाध्यक्ष तथा विजूकटाचे संघटन सहसचिव प्रा. मंगेश भोमले, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे वर्धा जिल्हा सचिव तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे व वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रमोद खोडे, मनोज डेकाटे, सिमा टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट चे संचालक प्रविण पेटकर, महालक्ष्मी आइस्क्रीम शॉप चे संचालक वैभव सोनकुसरे, दत्ता रहसे उपस्थित होते.

vardha-teacherमायेचे-पांघरुण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here