क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना बिंदू चौकात परिवर्तन फाउंडेशनतर्फे अभिवादन

kolhapur-savitri-poojan

कोल्हापूर (प्रतिनिधी नियाज जमादार) – ज्या काळात मुलींना शिक्षण देणे हे धर्माच्या विरुद्ध द्रोह समजला जात होता, त्या काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण देऊन महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी चळवळी ला साथ दिली व सावित्रीबाईंनी स्त्रीयांना स्वाभिमानाची शिकवणूक देऊन आत्मभान दिले, त्यामुळेच आज भारतातील स्त्रिया स्वावलंबी बनल्या व उच्च पदावर पुरुषांच्या बरोबरीने कार्य करू लागल्या असे मनोगत ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले.

kolhapur-news

बिंदू चौकात सावित्रीबाई फुले जयंतीदिनी परिवर्तन फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, पृथ्वीराज पठाडे,वि.स.खांडेकर प्रशालेचे ग्रंथपाल पी.डी. धनवडे, महेश पाटोळे,मनिषा घुणकीकर,अक्षय साळवे,अमर जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here