वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित यांना पत्रभुषण पुरस्कार
मुंबई (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – अभिजीत राणे युथ फौउडेशन आयोजित राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ नुकताच केशवराव गोरे सभागृह, गोरेगांव येथे थाटात पार पडला. जेष्ठ वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित यांच्या पत्रास सर्वोकृष्ट पत्र म्हणून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्धल मान्यवरांच्या हस्ते त्यांना वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे पत्रभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी कामगार नेते अभिजीत राणे, पत्रकार अनिल थत्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, माजी नगरसेवक विनोद शेलार, संपादिका सौ. अनघा राणे, अशोक राणे, अमोल राणे आदी मान्यवर उपस्थित होते. वृत्तपत्र लेखक हा समाजाचा आरसा असतो, सर्वसामान्यांच्या कथा, व्यथा, समस्या तो वर्तमानपत्राद्वारे मांडीत असतो कशाचीही अपेक्षा न करता. वृत्तपत्र लेखकाचे काम व महत्व एखाद्या योद्ध्या पेक्षा नक्कीच कमी नाही मात्र तो शासकीय स्तरावर उपेक्षितच राहिलाय परंतु अभिजीत राणे पत्रालेखकांचा सन्मान त्यांच्या कार्याची पावती सातत्याने देत असतात त्यांना ऊर्जा देता असतात आदी विचार मान्यवरांनी व्यक्त केले.
राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेसाठी सुमारे दीडशेच्यावर पत्रलेखकांनी आपल्या प्रवेशिका पाठविल्या होत्या त्यातून पंधरा पत्रांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली यात ठाणे येथील विश्वनाथ पंडित यांच्या पत्रास सर्वोकृष्ट प्रथम कमांक मिळाला तर अनुक्रमे दत्ता खंदारे धारावी, प्रिय मेश्राम नागपूर, सिराज शेख बीड, सुधीर कनगुटकर दिवा, दत्तप्रसाद शिरोडकर, सुभाष अभंग ठाणे, यशवंत चव्हाण बेलापुर, गणेश लेंगरे सोलापूर, किरण धुमाळ अकलूज तर उत्तेजनार्थ जनार्धन नाईक, शांताराम वाघ, रोहित रोगे, संगीता जांभळे, अनुज केसरकर यांची निवड झाली.
त्याचप्रमाणे कैलास रांगणेकर संपादक दैनिक मुंबई संघर्ष, पत्रकार महेश्वर तेटांबे, निसार अली, शांताराम गुढेकर, आकाश पोकळे, पंकजकुमार पाटील, लक्ष्मण राजे, रफिक घाची, गणेश हिरवे, उदय सांगळे, नीलेश धुरी, श्याम ठाणेदार, वैभव पाटील, गुरूनाथ तिरपनकर यांना पत्रिकेतील व सामाजिक योगदानाबद्यल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समारंभाचे प्रास्ताविक अनघा राणे यांनी केले तर सुत्रसंचालन गणेश हिरवे यांनी केले. समारंभाला लक्षणीय उपस्थिती होती.असे पत्रकार सुभाष शांताराम जैन कळवितात.







