मुंबई (संपादक सुनिल पाटील) – अभिजीत राणे युथ फाऊंडेशन आयोजित वृत्तपत्रलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच गोरेगाव मुंबई येथील केशव गोरे ट्रस्ट हॉल मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील नामांकित पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच वृत्तपत्रलेखक मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी महेश्वर तेटांबे यांनी वृत्तपत्रं क्षेत्रांत केलेली भरीव कामगिरी,सततच्या लॉकडाऊन आणि कोविड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता दिलेले महत्वपूर्ण योगदान, तसेच आतापर्यंतच्या त्यांच्या समाजकार्याची योग्य ती दखल घेवून उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कै.वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे यांच्या स्मरणार्थ विशेष पत्रकारीता पुरस्कार म्हणून शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व बुके देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मराठी बिगबॉस फेम सुप्रसिद्ध गगनभेदी व्यक्तिमत्व श्री अनिल थत्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते श्री अनिल गलगली, धडक कामगार युनियनचे अध्यक्ष व आयोजक श्री अभिजित राणे, माजी नगरसेवक श्री विनोद शेलार, जेष्ठ राजकीय समीक्षक श्री अशोक राणे, दैनिक मुंबईच्या संपादिका सौ अनघा राणे, वास्ट मीडियाचे सीईओ अमोल राणे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, समाजसेवक गणेश हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वृत्तपत्रलेखन स्पर्धेतील विजेते पत्रलेखक यांना पत्रभूषण तर पत्रकारितेत विशेष योगदान देणाऱ्या पत्रकारांना पत्रकारीता विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे लॉकडाउन काळात कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या निवडक सामाजिक कार्यकर्त्याना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.







