कल्याणंमधील एका गादीच्या दुकानाला भीषण आग

kalyan-fire

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कल्याण पूर्वेतील एका गादी विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण-हाजी मलंग मार्गावरील असलेल्या चेतना नाका येथे एका इमारतीत असलेल्या गादी विक्रीच्या दुकानात घडली आहे. आगीची तीव्रता एवढी होता की, लगतच्या दुकानांनाही त्याची झळ बसली आहे. या आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही.

कल्याण पूर्वेतील चेतना नाका परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये गॅलेक्सी नावाचे गादी विक्रीचे दुकानात आहे. आज दुपारच्या सुमाराला अचानक दुकानात आगीचा भडका उडाला. हे पाहताच दुकानातील मालक व कामगाराने बाहेर पळ काढला होता. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कपडे आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यत दुकानातील गादी व इतर साहित्य जळून खाक झाले होते. दुसरीकडे या घटनेमुळे परिसरात लागूनच असलेल्या दुकानदारांसह इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here