ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मीरा रोड येथील दोन बारमध्ये तंग व तोकडे कपडे घालून अश्लील अंगविक्षेप करणाऱ्या ८ महिला आणि त्यांना प्रोत्साहन देणारे २० कर्मचारी, अशा २८ जणांना काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काशिमीरा भागात असलेल्या बंपर बार अँड ऑर्केस्ट्रा आणि मीरागाव भागात असलेल्या मानसी ऑर्केस्ट्रा बार अँड रेस्टॉरंट मध्ये आर्थिक फायद्यासाठी महिला वेटर अंगविक्षेप करून ग्राहकांना आकर्षित करतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ चे उपायुक्त अमित काळे यांच्या पोलीस पथकाने या दोन्ही बारमध्ये छापा टाकला असता मानसी बारमधील ५ महिला वेटर व बंपर बारमधील ३ महिला वेटर अंगविक्षेप करताना आढळल्या.
काशिमीरा पोलिसांनी मानसी आणि बंपर बारमधील बार चालक, मॅनेजर, पुरुष वेटर यांच्यावर कलम १८८, २९४, ११४, १०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.







