सावित्रीबाई फुले जयंतीदिनी शिवसेनेने केली वचनपूर्ती

gulabrao-patil

धरणगाव (उपसंपादक प्रा.पी.एम.पाटील) – येथील धरणगाव नगरपरिषद व महात्मा फुले युवा क्रांती मंचच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले जयंती दिनाच्या कार्यक्रमात धरणगाव तालुका शिवसेनेने तालुक्यात इयत्ता दहावीला प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थिनीला मोटार सायकल भेट दिली.

सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथे आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नगर परिषदेमध्ये महिला शिक्षिका सन्मान सोहळ्याचे आयोजन केले गेले. मागील वर्षी इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दहावी तालुक्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस मोटर सायकल भेट देण्याची घोषणा केली होती. या वचनाची पूर्ती आज या कार्यक्रमात धरणगाव तालुका शिवसेनेने पुर्ण केली. मोठा माळी वाडा भागातील रहिवासी विशाखा विजय महाजन ही विद्यार्थिनी शेतात काम करून तालुक्यात इयत्ता दहावी मध्ये ९६.२० टक्के मिळवून प्रथम क्रमांकाने पास झाली.

आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा शिवसेनाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, माजी नगराध्यक्षउषाताई वाघ, उपनगराध्यक्षा कल्पना महाजन, सर्व नगरसेवक गटशिक्षणाधिकारी अशोक बिर्‍हाडे, प.रा. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीवकुमार सोनवणे, माजी मुख्याध्यापक बी. एन. चौधरी, विशाखाचे आई-वडील यांच्या उपस्थितीत तिला ७५००० रुपये किमतीची प्लेजर मोटरसायकल भेट दिली.

यावेळी विशाखा व तिचे आई-वडिल विजय जयराम महाजन यांच्या डोळ्यात आनंदाश्रूचा अनुभव सर्व उपस्थितांना आला.या कार्यक्रमाला उज्ज्वला सोळंके,सुरेखाताई विजय महाजन,अंजलीताई विसावे, किर्ती मराठे,संगीता मराठे, मंदाताई धनगर, आराधना पाटील, त्यांनी धरणगाव तालुका शिवसेनेचे व पालक मंत्री गुलाबराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांचे मनापासून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here