अंगणवाडी सेविका सौ.सिमा शरद कुलकर्णी यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार

seema-kulkarni-satkar

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – महाराष्ट्र शासन महिला व बाल विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना मार्फत अंगणवाडी सेविका , मदतनिस यांनी करोना महामारीच्या काळात सर्वेक्षणाचे काम अविरतपणे केल्याने त्यांचा सत्कार जळगांवचे मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत. मुख्य कार्यकारी आधिकारी डाँ.बि.एन्.पाटिल. जिल्हापरिषदेचे कार्यक्रम अधिकारी रफीक तडवी जि.प.जळगांव.बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी. मुख्यसेविका आदि ऊपस्थित होते.

sima-kulkarani-certificate

यावेळी जिल्हाधिकारी सर्वांचे कौतुक करतांना म्हणाले की आपण मेहनतीने या काळात समाज हेच कुटुंब समजुन स्वताःच्या जिवाची पर्वा न करता काम केले याबद्दल सर्वांचे अभिनंदन .शासकीय योजना या तळा गाळापर्यंत पोहचवयाच्या असतील तर अंगणवाडी ताई शिवाय पर्याय नाही.

anganwadi-sevika-jalgaon

अमळनेर तालुक्यातुन शिरुड येथील अंगणवाडी सेविका सौ.सिमा शरद कुलकर्णी यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करणात आला. या प्रसंगी सौ.कुलकर्णी म्हणाल्या कि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी घराबाहेर पडुनच महिलांच्या शिक्षणाची ज्ञानगंगा आणली त्याप्रमाणेच आमच्या सर्व अंगणवाडी सेविकाताई करोना काळात घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या प्रकल्पाची माहिती दिली.यामुळेच शासनातर्फे आमचा सत्कार केला आहे या कामी आम्हाला अमळनेर चे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.बि.बि.वारुळकरसो, व पर्यवेक्षिका श्रीमती ए.एस.थोरात मँडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here