दोंडाईचा रोटरी सिनिअर्सच्या अध्यक्षपदी चेतन सिसोदिया यांची निवड

दोंडाईचा (संतोष कोळी) – दोंडाईचा शहरातील अग्रगण्य सामाजिक संघटना रोटरी क्लब दोंडाईचा सिनिअर्सच्या अध्यक्षपदी दोंडाईचा शहरातील सामाजिक युवा कार्यकर्ते चेतन सिसोदिया यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तर उपाध्यक्षपदी सुरेश जैन व सचिवपदी राजेश माखिजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रोटरी इंटरनँशनल या जागतिक सामाजिक संस्थेची स्थापना अमेरीकेत पाँल हँरीस यांनी आपल्या ४ सहकारीसोबत १९०५ यावर्षी केली , गेल्या ११५ वर्षात रोटरीचे जगात जवळपास सर्वच देशांत आपल्या शाखा निर्माण करुन पोलीओ निर्मुलन ,साक्षरता , उद्योग व्यवसायांना चालना इ अनेक प्रश्नांना हाती घेऊन शासनासोबत निराकारण करण्याचा प्रयत्न करीत असतात .ह्याच अनुषंगाने रोटरी क्लब सिनिअर्सने दोंडाईचा शहरात समाजसेवा करीत रोटरी आय हॉस्पिटल ,रोटरी पतपेढी , डॉ सोहनी परिवार जयपुर फुट केंद्र इ अनेक कायमस्वरुपी प्रकल्पाची सेवा परिसरातील नागरिकांना मिळत आहे .
रोटरीचे संपुर्ण जगभरात १ जुलै ते ३० जुन हे वर्ष असते दरवर्षी नविन व्यक्ती अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारुन नविन कार्यकारणी घोषीत करुन आपल्या वर्षांत अधिकाधिक सामाजिक उपक्रम राबवीण्याचा प्रयत्न करीत असते .
रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सच्या अध्यक्षपदी चेतन सिसोदिया पदभार स्विकारुन सचिवपदी राजेश माखीजा व इतर अनेक नविन पदाधिकारींची निवड करण्यात आली आहे . नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन मा.आमदार जयकुमार भाऊ रावल ,विकासरत्न सरकारसाहेब रावल ,माजी आमदार बापूसाहेब रावल ,मा.नगराध्यक्षा ताईसौ नयनकुवँर रावल ,रोटरीचे जेष्ठ सदस्य नानासाहेब टोणगांवकर , डॉ मुकुंद सोहनी , डॉ अनिल सोहनी ,राजेश मुणोत ,सुरेश जैन यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here