- रहिवाशी संस्थेच्या नामफलकाचे अनावरण
- क्रियाशील प्रेस क्लब रहिवाशी संघाच्या पाठीशी
नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नवीन पनवेल येथील पंचशील नगर रहिवाशी संस्थेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी केले. आज नवीन पनवेल येथील पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संघाच्या नामफलकाचे अनावरण क्रियाशील प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रकाश म्हात्रे, उपाध्यक्ष अनिल राय, सरचिटणीस राज भंडारी, प्रसिद्धी प्रमुख सनीत कलोते, विशाल सावंत तसेच पंचशील नगर रहिवाशी संघाचे उपस्थित होते. यावेळी रहिवाशी संघाच्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.क्रियाशील प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू यांनी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचा विश्वास येथील रहिवाशांना दिला,
यावेळी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, सचिव राहुल पोपलवार, खजिनदार भानुदास वाघमारे, सहखजिनदार कांताबाई वानखेडे, सहसचिव विनोद खंडागळे, संघटक कैलास नमाडे, सहसंघटक सुरेखा वायदंडे सदस्य सुरेश पराडा,संतोष ढोबळे, संतोष जाधव, हेमा रोड्रिंक्स, शोभा गवई , अमेय इंगोळे, वली महमद शेख,संजय धोत्रे, अजय दुबे,रामदास खरात सल्लागार वकील रामभाऊ कांबळे यांना क्रियाशील प्रेस क्लबच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.








