डीएन नगर अंधेरी पश्चिम, मुंबई परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष का ?

andheri-problem

महाराष्ट्र क्रांती संघटना प्रमुख पी बी कोकरे यांचा
महानगरपालिका अधिकारी यांस लेखी तक्रारीनुसार प्रश्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी जगदीश काशीकर) – गेल्या कित्येक महिन्यापासून मुंबई मेट्रो एमएमआरडीए व लॉटस डेव्हलपर्स यांच्या गलिच्छ कारभारामुळे अंधेरी पश्चिम डी एन नगर मेट्रो स्टेशनच्या खाली जे पी रोड व न्युलिंक रोड सरप्राईझींग द सिटी बिल्डिंग लगत सर्वसामान्य जनतेसाठी पायवाट म्हणून असणाऱ्या फुटपाथची तोडून फोडून विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात आले असून त्याच परिसरातून वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुले रात्रदिवस प्रवास करत असतात फुटपाथची अवस्था बिकट असल्याने मोठया जलदगतीने धावणाऱ्या गाड्यांची रहदारी त्या रस्त्यावरून असून देखील स्वताचा जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरून सर्वसामान्य जनतेस प्रवास करावा लागत असतो

या सर्व प्रकाराकडे अद्याप महानगरपालिकेचे लक्ष का नाही फूटपाथची तोडफोड करून पाय वाट उदवस्थ करणाऱ्यांन वर कृपा कुणाची जेंव्हा त्या परिसरात कोणा एकाचा बळी जाणार तेव्हांच महानगरपालिकेस जाग येणार का हा सर्वसामान्य जनतेस पडलेला प्रश्न?

मुंबई मेट्रोने आपले काम चालू केले लॉटस डेव्हलपर्सने आपल्या जागेचे कुंपण अर्थात (बॉण्डरी) करून घेतली पण तिथुन प्रवास करताना दररोज मूर्त्यूशी सामना करतोय तो माझा सर्वसामान्य नागरिक संबंधित विषयाकडे जलदगतीने लक्ष घालून दोषींवर कारवाई व फुटपाथची लवकरात लवकर पुनर्बांधणी करून तमाम वयोवृद्ध नागरिक माता भगिनी लहान मुले याना न्याय देण्यात यावा. अंधेरी पश्चिम परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असल्यास तीव्र स्वरूपाचा लढा उभारला जाईल असा इशारा महाराष्ट्र क्रांती संघटनेचे प्रमुख श्री पी बी कोकरे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here