महिलांच्या प्रचंड प्रतिसादाने बार्शीत नशीब महासंघाचा भव्य मेळावा संपन्न

barshi-mahila-melava

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – नवभारत ॲग्रोटेक ,स्किल डेव्हलपमेंट ,हाउसिंग बिजनेस महासंघ, गोरमेंट रजिस्टेशन, शासनमान्य उर्फ नशीब महासंघाच्या माध्यमातून बार्शी शहर व तालुक्यातील बेरोजगार महिला ,बचत गट ,नवीन उद्योजक याना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ,सक्षम करण्यासाठी, पश्चिम महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर, सोलापूर जिल्हा नशीब चे जिल्हाध्यक्ष दीपक भैय्या आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी येथील लिंगायत बोर्डिंग मंगल कार्यालय येथे दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत भव्य मेळावा संपन्न झाला.

या मेळाव्यात 1542 महिलांनी नाव नोंदणी केली. संयोजकांच्या वतीने मेळाव्यात आलेल्या महिला भगिनी साठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी बार्शी संचलीत, श्रीमान राम भाई शहा रक्तपेढी बार्शी. यांच्या वतीने मोफत रक्त तपासणी. शिबिर संपूर्ण रक्तातील 18 घटक मोजणी ,ब्लड ग्रुप तपासणी मोफत करण्यात आली.तसेच आलेल्या सर्वांसाठी राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्र यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नशीब चे राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाऊ बोराडे, राष्ट्रीय सचिव ओंकार भाऊ बोराडे, शैलेश कोंडगावकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नशीब यांनी महिला नव उद्योजक सुशिक्षित बेकर मेळाव्यास आलेल्या सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले .

यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाऊ बोराडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की नशीब महासंघ केंद्र शासन, निधी आयोग ,कौशल्य विभाग, यांच्याशी कायदेशीर संलग्न आहे. महिला, बचत गट, शेतकरी, कामगार, युवक-युवती बेरोजगारांना सुवर्ण संधी असून 6900 बार्शी शहर व तालुक्यात 6900 बार्शी ग्रामीण साठी रोजगार निर्मिती करणार असून प्रत्येक खेडेगावांमध्ये पन्नास जणांना व दोन हजार जणांना बार्शी शहरांमध्ये व्यवसाय शेळीपालन, गोरक्षण, शेतीपूरक उद्योग,, शेतीमाल प्रक्रिया उद्योग ,कुक्कुटपालन, मत्स्य पालन, मसाले ,चटणी, पापड इत्यादी व इतर उद्योगासाठी एक लाखापासून दहा लाखापर्यंत फाईल तयार करून बँकेकडून मंजुरी यात कर्जदाराची दहा टक्के मार्जीन मनी, तसेच केंद्र व राज्य शासनाची 15 ते 25 टक्के सबसिडी मिळवून देणार .फिरती हॉटेल्स बार्शी शहरात 13 ,बार्शी ग्रामीण तीन बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी असून यात 25 टक्के सबसिडी मिळणार असून नवउद्योजक यांनी नशीब संस्थेत नाव नोंदणी करून या कोरुना काळाच्या अडचणीवर मात करावी .व आपले कुटुंब राज्य, राष्ट्र यांच्या उन्नती त सहभाग नोंदवावा .तुमच्या स्वप्नाला भरारी देण्यासाठी नशीब महासंघाच्या वतीने आपल्या स्वप्नपूर्तीसाठी रात्रंदिवस झटत आहे .तसेच स्वस्त घरकुल योजना राहत्या घरासाठी ही शासनाची सबसिडी मिळून देऊ. तसेच सौंदरे येथे पाचशे कोटी चा प्रकल्प, स्वस्त घरकुल योजना,, एमआयडीसी, नागरिकांना ,युवकांना, महिलांना रोजगाराची संधी तसेच वैराग चे शलाका ताई मरोड यांनीही महिलांना मार्गदर्शन केले .

महिला अबला नसून सबला आहे यापुढे पतीचा मृत्यू झाल्यास कुंकू पुसायचा नाही, मंगळसूत्र काढायचे नाही, बांगड्या फोडायचे नाही, अशा सर्व महिलांनी क्रांतिकारी शपथ घेतली. या भव्य मेळाव्यात वर्षा ताई ठोंबरे ,एडवोकेट आरगडे मॅडम, गुंड पाटील, इनरव्हील क्लबच्या महिला मंडळ व शहरातील मान्यवर महिला भगिनींनी भेट दिली व शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या आई साहेब पत्नी व सर्व परिवार रसाळ परिवार, शिवसेनेच्या जिल्हा संघटक सुनीताताई जाधव ,माजी नगरसेविका खाजाबी पठाण व असंख्य समाजसेविका महिला कार्यकर्त्या व शेकडो मेळाव्यास आलेल्या महिलांचे व लिंगायत बोर्डिंग चे अध्यक्ष रावसाहेब मनगिरे मालक यांनी नाममात्र भाड्यात सामाजिक कार्यासाठी मंगल कार्यालय उपलब्ध केल्यामुळे यांचे आभार नशीब महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दीपक भैय्या आंधळकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नसीम महासंघाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, महिला शिवसेनेच्या महिला भगिनी ,राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्र लय चे सर्व युवक, महिला भगिनी, कार्यकर्ते, स्टार फाउंडेशन चे कार्यकर्ते यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here