राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

nandurbar-journalist

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करून जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.

गेल्या महिन्यात दि.11 डिसेंबर 2020 रोजी राज्यभर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमाने पत्रकारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र शासनापर्यंत निवेदन देण्यात आले होते.मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया संघापर्यंत पोहोचली नसल्यामुळे आज राज्यभर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.आमच्या मागण्या पुढील दोन महिन्यात मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यभर पत्रकारांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यात प्रामुख्याने पत्रकारांना प्राधान्याने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करावी,पत्रकारांना प्रवास करत असलेल्या वाहनांना टोल माफी मिळावी,कोरोना व्हायरस प्रतिबंधक लस प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी, तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार भवन शासनाच्या वतीने बांधून देण्यात यावे,तालुका जिल्हा व प्रदेश कार्यकारणीतील पत्रकारांना शासकीय समित्यांमध्ये समाविष्ट करावे,वयोवृद्ध पत्रकारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन योजना लागू करावी,प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहत निर्माण करून पत्रकारांना हक्काचे घर देण्यात यावे,शासकीय विश्रामगृहाचा पत्रकारांना मोफत लाभ मिळावा,नंदुरबार येथील सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्री ट्रस्ट संचलित एस.ए.मिशन प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुलभा पवार यांना न्याय मिळावा,पत्रकारांना मोफत आरोग्य विमा व अपघात विमा संरक्षण मिळावे,राज्यातील शासकीय भूखंड पत्रकार बहुउद्देशीय संघांना सामाजिक उपक्रमासाठी देण्यात यावे.यासह 14 ठळक मागण्यांचे निवेदन आज नंदुरबार येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले.

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील,एकनाथ पाटील,सुलभा पवार, गिरधर मोरे,योगेश्वर बुवा,प्रभू तडवी,चेतन इंगळे,शेख इलियास,ताहीर सरदार मन्सुरी,सुखदेव देसले,नंदुरबार तालुकाध्यक्ष अशोक पाटील तसेच जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी उपोषण करून निवेदन सादर केले.

दरम्यान शहादा तहशील कार्यालय येथे पण तालुका पदाधिकाऱ्यांनी एक दिवशीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले.तहशिलदार प्रतिनिधी श्री.अमृतकर यांनी उपोषण स्थळी येवून निवेदन स्विकारले.यावेळी कल्पेश राजपूत, सुरेश पाटील,भरत पाटील,रामेश्वर गिरासे,प्रकाश गिरासे,ॲड.दिनेश महिरे,ईश्वर रोकडे,मनोजकुमार बाफणा,राजाराम माळी,कैलास पाटील,भरत गवळे,कृष्णा कोळी,गोरख पावरा आदी उपस्थित होते.

https://fb.watch/2SsPm_l13s/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here