लॉकडाऊनच्या सहाव्या दिवशी जिल्ह्यात २३८ कोरोना बाधित

जळगाव (प्रतिनिधी) – शहर व परिसरात तसेच कोरोना प्रादुर्भाव असलेल्या परिसरात दि. ७ ते १३ जुलै लॉकडाऊन लावल्याच्या सहाव्या दिवशी २३८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात विशेष म्हणजे जळगाव शहर, चोपडा व मुक्ताईनगर या भागात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला असून, शहरात सर्वाधिक ८३ रुग्ण आढळले आहे.
कोरोना बाधित आढळलेल्या २३८ रुग्णांमध्ये चोपडा-३२, मुक्ताईनगर- ३१, जळगाव ग्रामीण-७, भुसावळ-६, अमळनेर-६, भडगाव-८, धरणगाव-१५, यावल-१०, एरंडोल-४, जामनेर -१२, रावेर -१३, पारोळा-२, चाळीसगाव ९ अशी रूग्ण संख्या आहे. यामुळे जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधित रूग्ण संख्या ५ हजार ९६२ एवढी झाली आहे.
दरम्यान, आजवर ३५४२ रूग्ण बरे झाले आहेत. सद्यपरिस्थितीत कोविड केअर सेंटरमध्ये-१४५२; कोविड हॉस्पीटलमध्ये-१३२ तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये ४६९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ८ मृत्यू झाले त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या ३२९ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here