पत्रकार दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्यावतीने कोरोना योध्दा वृत्तपत्र लेखकांचा गौरव

marathi-vrutapatra-lekhak-sanghatna

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – दिनांक ६ जानेवारी २०२० रोजी दर्पणकार, आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त , पत्रकार दिनाचे औचित्य साधून मुंबई वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने कोरोना योध्दा वृत्तपत्र लेखकांचा गौरव करण्यात आला.

आमदार मनिषा कोयंडे, डॉ.कुशल कोयंडे, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे आदि मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन या वृत्तपत्र लेखकांचा गौरव करण्यात आला.कोरोना योध्दा वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित , मनोहर साळवी , विजय ना कदम , सुरेखा गावंडे , सुनिल कुवरे , किरण चौधरी , कमलाकर जाधव , भारत कवितके, नंदकुमार पाटील, श्रीनिवास डोंगरे , चंद्रकांत पाटणकर , दादासाहेब जेंधे , लक्ष्मण राजे , बाळ पंडित , मनमोहन रोगे , राजेंद्र घरत , विवेक चिवटे , राजन देसाई , सुधीर कनगुटकर ,अरूण खटावकर , शकील जाफरी, आत्माराम गायकवाड , सुभाष जैन या वृत्तपत्र लेखकांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊनच्या काळात जागतिक संकट आले असताना, अशा कठीण परिस्थितीत विविध वर्तमान पत्रातून वृत्तपत्र लेखकाच्या नात्याने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून वृत्तपत्र लिखाणाचे महत्वपूर्ण सामाजिक जनजागृतीचे कार्य केले. तसेच आरोग्यखाते व सरकार यांना बहुमोल सुचना केल्या. या योगदानाची दखल घेऊन त्यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी आमदार मनिषा कोयंडे, डॉ.कुशल केळशीकर, ज्येष्ठ पत्रलेखक संतोष आंधळे, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.तसेच संघाचे पदाधिकारी, मुंबईतील पत्रकार , वृत्तपत्र लेखक, आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

vrutapatra-lekhak-sangh

corona-yodha

corona-sanman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here