नाशकात नायलॉन मांजाने कापला गेला युवकाचा गळा

naylon-manja

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – एका महिलेचा नायलॉन मांजामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर नाशकात पुन्हा एकदा एका युवकाचा गळा नायलॉन मांजाच्या धाग्याने कापला गेल्याची घटना घडली आहे.हा युवक इंदिरानगर परिसरात राहत असून त्याचे नाव मयूर कुलकर्णी असल्याचे समजते. दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक त्यांच्या मानेला नायलॉन मांजाचा विळखा बसला. काही कळण्याच्या आत त्यांच्या मानेला मोठी चिर पडली. त्यांच्या गळ्याला सात ते आठ टाके घालण्यात आले आहेत.

या युवकाची परिस्थिती धोक्याबाहेर असल्याचे समजते. या युवकावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.महिलेच्या मृत्यूनंतर नाशिक शहर पोलिसांनी नायलॉन मांजाच्या विरोधात कारवाई सुरु केली आहे. शहराच्या विविध भागात सध्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जात आहे.

या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. दुचाकीने प्रवास करताना नियमित डोक्यावर हेल्मेट आणि गळ्याला दुपट्टा अडकवला पाहिजे. यामुळे काही प्रमाणात अचानक ओढवणाऱ्या घटना टाळता येतील सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here