महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी हेमंत नागराळे

hemant-nagarale

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

नगराळे हे सध्या पोलिस महासंचालक विधी आणि तंत्रज्ञान चा भार सांभाळत होते. त्यासोबत आता त्यांना महाराष्ट्र पोलिस महासंचालक पद देण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाच्या शर्यतीमध्ये सुरूवातीपासूनच हेमंत नगराळे यांच्या नावाची चर्चा होती. त्यांच्यासोबत या शर्यतीमध्ये संजय पांडे, रजनीश सेठ देखील चर्चेमध्ये होते.

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार नगराळे हे दुसऱ्या क्रमांकावर येतात. त्यांच्या आधी संजय पांडे यांचा क्रमांक लागतो. मात्र संजय पांडे हे जून 2021 मध्ये सेवानिवृत होत आहेत. त्यामुळे नगराळे यांचं नाव आघाडीवर होते. हेमंत नगराळे यांनी यापूर्वी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त पद भूषवलं आहे. त्यावेळेस मार्च 2018 मध्ये विधानपरिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणं नगराळेंना भोवलं होतं. त्यावरून निलंबनाची देखील कारवाई झाली होती. तर याच कारकीर्दीमध्ये वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात करणं, 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात कायदा-व्यवस्था उत्तम ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप देखील मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here