खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – तालुक्यातील वेरूळ शिवारातील मौजे शेकापुर येथे तूर कापणी प्रयोग उत्पादनाचे पर्यवेक्षण उपविभागीय अधिकारी पी.आर. देशमुख यांच्यासमक्ष करण्यात आले. प्रत्येक तालुक्यातील शासकीय बारा पिकांचे दोन टक्के तपासणी शासकीय उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे असते . या अनुषंगाने खुलताबाद तालुक्यातील वेरूळ परिसरातील मौजे शेकापूर येथे समूहातून तूर पिकाची निवड करण्यात आली होती त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये तूर लागवडीपासून सोंगणी काढणीपर्यंत सर्व कामे अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांना कराव्या लागतात यावर शासन प्रत्येक पिकाचे उत्पन्न निश्चित करत असतात.
याप्रसंगी खुलताबाद तालुक्यातील महसूल मधील बारा पिकांचे बारा गावांमधील दोन टक्के प्रमाणे 24 टक्के पिकाचे उत्पादन क्षमताही उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यामार्फत होत असते म्हणून मंगळवार रोजी खुलताबाद तालुक्यातील शेखापुरी गाव समूहातील तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दोन गुंठे तुरीचे उत्पादन सरासरी काढण्यात आले यामध्ये तूर कापणी पासून काढणीस सोंगणी पर्यंत दोन गुंठ्यांमध्ये तुरीचे उत्पादन निश्चित करण्यात आले एकंदरीत हिशोब बघता हेक्टरी तुरीचे उत्पादन सात कुंटल याप्रमाणे भरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा यंदा खर्च लक्षात घेता उत्पन्नामध्ये कमालीचे नुकसान झाले आहे.
तूर पिकाचे उत्पन्न सर्वेक्षण वेळीसोबत एचडीएफसी पिक विमा कंपनीचे एम ए भिंगारे आणि कृषी पर्यवेक्षक जी जी मुंडे, कृषी सहाय्यक डवारे, गिरम शेतकरी गणेश मालोदे यांच्यासमक्ष वजन माप करण्यात आले आणि हेक्टरी उत्पादन निश्चित करण्यात आले.मात्र यावर्षी पाऊस पाणी जास्त असल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले.
या अनुषंगाने पिक विमा कंपनी मागील सात वर्षात आलेल्या उत्पन्न आलेल्या आणि तालुक्यातील निवडलेल्या गेल्या पाच वर्षात आलेल्या उत्पन्नाची सरासरी काढून उत्पन्न ची सरासरी निश्चित करते त्या अनुषंगाने ेतकऱ्याचे उत्पन्न हेक्टरी निश्चित होते आणि पिक विमा कंपनी यानुसार शेतकऱ्याला भरपाई देत असते.







