खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – शहरातील श्री घृष्णेश्वर विद्यालय येथे विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक कै.पंढीरीनाथ पाटील शिसोदे(भाऊ) ढाकेफळकर यांच्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. दरवर्षी १जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
या कार्यक्रमांमध्ये तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा ,कब्बडी ,खो-खो, वाद-संवाद, रांगोळी अश्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असे परंतु या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे कोणत्याही स्पर्धाचे आयोजन करण्यात आले नाही.भाऊंच्या प्रतिमेस प्राचार्य अशोक गायकवाड, प्रविन विधाते, विठ्ठल पडुळे, दिलीप बागले ,भगवान इंगळे ,सय्यद नईम ,अच्युत बोराडे, राजेन्द्र गंगावणे, अनिल गायकवाड, रामेश्वर राठोड, सोपान आढाव ,रामेश्वर धारे ,,बापू रायते,,देविदास निकम, चंद्रकांत चौधरी,संजय नलावडे, बप्पासाहेब लव्हगळे, सतिष पुंगळे, धिरज मगरे संजय वरकड मधुकर नागपुरे सचिन जाधव ,संतोष जोशी, इफ्तेकार कुरेशी, पंढरीनाथ खेडकर , शिवनारायण रेणुके, दिलीप मालोदे, शेख बन्नो ,रविंद्र सावजी, सुर्यभान बटुळे,शिला भोसले, सविता धिवर,वंदना राठोड आदिची उपस्थिती होती.







