विद्याविहार रेल्वे स्थानकात चीफ बुकिंग सुपरवायझरची आत्महत्या

sucide

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – विद्याविहार रेल्वे स्थानकातील कार्यालयात चीफ बुकिंग सुपरवायझरने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. कैलास कदम (55) असे त्यांचे नाव होते. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

गुरूवारी सकाळी कैलास कदम हे त्यांच्या कार्यालयात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळल्याने रेल्वे स्थानकात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कदम यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता राजावाडी रुग्णालयात नेला. परंतु कदम यांनी आत्महत्या का केली ते समजू शकले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here