मराठा आरक्षणाबाबत रणनीती ठरणार नोकर भरती MPSC, ESBC व SEBC नियुक्त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत निर्णय

udhav-takare

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – मराठा आरक्षण कायद्यावर २५ जानेवारीपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सदर च्या केस मध्ये अनेक मराठा याचिकाकर्ते आहेत. अशा सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांसोबत सरकार बैठक घेऊन सुनावणीदरम्यान, बाजू मांडण्यासाठी आवश्यक असल्यास ज्येष्ठ विधिज्ञ ॲड हरीश साळवे सारख्या विधिज्ञांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

दिनांक २५ जानेवारी पासून मराठा आरक्षण कायद्यावर सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी होणार आहे. त्यासाठी दिल्लीत समन्वय करण्यासाठी ज्येष्ठ मंत्री ना.अनिल परब व माजी ॲड जनरल विजय थोरात यांनी सरकारतर्फे जबाबदारी घेण्याचाही आज निर्णय झाला.

दिनांक २३ डिसेंबरला ईडब्ल्यूएस चा लाभ मराठा विद्यार्थ्यांना देण्यासंबंधात सरकारने काढलेल्या अध्यादेशाबाबत मराठा समाजात अनेक गैरसमज आहेत. त्याचा विपरीत परिणाम आरक्षणाच्या केस वर होईल अशीही भीती समाजात आहे. त्यासंदर्भात EWS च्या आरक्षणाचा लाभ आरक्षणावरील केसचा अंतिम निर्णय येईपर्यंतच असेल व SEBC आरक्षण मिळाल्यावर EWS आरक्षण बंद होईल असा सुधारित अध्यादेश काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत होऊन त्याप्रमाणे असे शपथपत्रं सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.maratha reservation

२०१४चे ESBC व २०१९-२०चे SEBC चे अनेक उमेदवार नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. यासंबंधात सर्व याचिकाकर्त्यांचे वकील, सरकारचे ज्येष्ठ विधिज्ञ यांची सोमवारी दिल्लीत बैठक होऊन त्यावर चर्चा करून त्यासंदर्भात येत्या आठवड्यात मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्याचे या बैठकीत मान्य केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परिक्षेसंदर्भात मराठा समाजावर तसेच खुल्या प्रवर्गावर अन्याय करणारी परिपत्रके दि. ३० डिसेंबर २०२० आणि ४ जानेवारी २०२१ रोजी काढली आहेत. सदरच्या परिपत्रकांवर चर्चा करून तातडीने सुधारित परिपत्रके काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला गेला.

मराठा आरक्षणाच्या अशा इतर अनेक प्रलंबित विषयांवर मा. श्री अजितदादा पवार, मा. श्री. एकनाथ शिंदे आणि मा. श्री अनिल परब यांजबरोबर चर्चा करून त्यासंदर्भात निर्णय घेण्यासंबंधात आजच्या बैठकीमध्ये ठरले. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांसोबत एकनाथ शिंदे, अनिल परब, माजी ॲड जनरल विजय थोरात, तसेच मुख्य सचिव, प्रधान सचिव व इतर अनेक विभागांचे सचिव उपस्थित होते अशी माहिती विनायकरावजी मेटे यांनी दिली. त्याचप्रमाणे विनायकरावजी मेटे यांजसोबत सुरेश पाटील, राजन घाग, विनोद पाटील, आबा पाटील, विक्रांत आंब्रे, प्रफुल्ल पवार, अभिजित घाग, रुपेश मांजरेकर, विवेक सावंत, विलास सुद्रीक, सत्यवान राऊत, प्रवीण पाटील, बलराम भडेकर, आणि अनेक मराठा समन्वयक, मान्यवर अशांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here