दुचाकीवरून मोबाईल स्नॅचिंग करणारे दोघे कोनगाव पोलिसांच्या जाळ्यात

thane-crime

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – दुचाकीवरून मोबाईल स्लॅचिंग करणाऱ्या आरोपीतांना कोनगाव पोलीस ठाण्यात अटक करुन त्यांचेकडुन ०३ गुन्हे उघडकीस आणुन ६ मोबाईल हस्तगत केले.

कोनगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. | ०२/२०२१ भा.द.वि.कलम ३९२, ३४ मधील फिर्यादी नामे चंद्रमोहन मोतीलाल मीना, वय १९ वर्षे, व्यवसाय- नोकरी, रा. भुमी वर्ल्ड, समीर भाई यांचे हॉटेलजवळ, पिंपळास, ता. भिवंडी व त्याचा भाऊ गंगाराम मीना असे पायी चालत पाईपलाईन रोडने भूमी वर्ल्ड येथून रांजणोलीनाका येथे जात असतांना, टेमघर फाटा, ता. भिवंडी, जि. ठाणे येथे रांजणोली बाजुकडून दोन अनोळखी चोरटे ग्रे रंगाच्या ज्युपीटर मोटार सायकल (नंबर प्लेट नसलेली) वरून फिर्यादी यांचे जवळ येवून ज्युपीटर गाडीचे पाठीमागे बसलेल्या अटक आरोपीत याने त्याचे खिशातुन चाकू काढून ‘तुम्हारे पास जो भी है वो निकालो, नही तो मार डालेंगे’ अशी धमकी देवुन दोघांनी मिळून फिर्यादी व त्यांचे भावास हाताचे चापटीने मारहाण करुन फिर्यादी यांचे भावाचे खिशातील वरील वर्णनाची व किंमतीची दोन विवो कंपनीचे मोबाईल व गळयातील चांदीची चैन जबरीने काढुन घेवून पळून गेले होते. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक ०३/०१/२०२१ रोजी गुन्हा दाखल आहे. नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना अटक करणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिलेल्या होत्या.

त्याअनुषंगाने सपोनि/अभिजीत पाटील, यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचे मोबाईल विक्री करण्यासाठी रांजणोलीनाका येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाचे सपोनि/अभिजीत पाटील, पोउपनि/शेरखाने व पथकाने रांजणोली नाका येथे सापळा लावुन आरोपीत नामे १) आदिल अब्दुल कय्युम शेख (वय-१९ वर्षे, रा. रूम नं. ३०२, दुसरा माळा, गणेश सोसायटी, पिंगारा बारच्या पाठीमागे, पिसवली गांव रोड, टाटा पॉवर हाऊस, कल्याण (पूर्व)) २) विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून वर नमुद गुन्हयातील २ मोबाईल व चांदीची चैन तसेच त्यांनी गुन्हयात वापरलेली ग्रे रंगाची ज्युपीटर मोटार सायकल (नंबर नसलेली) जप्त केली आहे. आरोपीतांकडे केलेल्या चौकशीत कोनगांव पोलीस स्टेशन, भिवडी येथील ३ गुन्हे उघडकीस आणून त्यांचेकडून एकूण ६ मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.

आरोपीतांकडून १) ५,०००/- रू. चांदीची चैन वजन ३ ते ४ तोळे अशी जुवाकिंसु.गु.र.नं.०२/२०२० भा.द.वि.क ३९२,३४ मधील) २) १०,०००/- रु. किंमतीचा विवो कंपनीचा एस-१ मोबाईल जुवाकिंसु..(गु.र.नं.०२/२०२०भा.द.वि.क ३९२,३४) ३) २,०००/- रू किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जुवाकिंसु..(गु.र.नं.०२/२०२० भा.द.वि.क ३९२,३४ मधील) ४) १६,९९९/- रू.किंमतीचा विवो कंपनीचा Y50 मोबाईल जु.वा.कि.सु.(गु.र.नं.०३/२०२० भा.द.वि.क ३९२,३४ मधील) ५) ६,०००/- रुपये किंमतीचा एक Realme मोबाईल जु.वा.कि.सु.गु.र.नं.०६/२०२० भा.द.वि.क ३९२ मधील) ६) ३०,०००/- रू. किंमतीची टिव्हीएस कंपनीची ग्रे रंगाची ज्युपीटर मो.सायकल नंबर प्लेट नसलेली तिचा चेसिस नंबर-EGADK1412191 जुवाकिंसु.(गु.र.नं.०२/२०२० भा.द.वि.क ३९२,३४ मधील) ७) ८,०००/- रुपये किंमतीचा एक MI कंपनीचा सिलव्हर रंगाचा मोबाईल त्याचा IMEL 1: 869822039014540, IMEI 2: 869822039014557 असा ज.वा.कि.स. ८) ७,०००/- रुपये किंमतीचाएक TECNO spark कंपनीचा मोबाईल त्याचा IMEI 1: 352659320395806, IMEI 2: 352659320395814 असा एकूण जु.वा.कि.सु. ८४,९९९/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरील नमुद मोबाईलचे IMEI नंबरचे अनुषंगाने कोणते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्यास त्याबाबत इकडील पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन कोनगाव पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, प.प्रा.वि. ठाणे अनिल कुंभारे, अतिरीक्त कार्यभार पोलीस उप आयुक्त परि-२, भिवंडी संजय जाधव, सहा.पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि/अभिजीत पाटील, सपोनि किरण वाघ. पोउपनि/जीवन शेरखाने, सपोउपनि/वामन सुर्यवंशी, पोहवा/राजेश शिंदे, पोहवा/३६७७ मोरे,, पो. ना/१२५५ संतोष पवार, पोशि/७२०३गणेश चोरगे, पो.शि/७०५६ नरेंद्र पाटील, पो.शि/७२२१ कृष्णा महाले, पो.शि/७२३६ भागवत टफिफळे. पोशि/ढवळे, व पो.शि/८१७३ अविनाश पाटील यांनी केलेली असुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, अभिजीत पाटील हे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here