गरीब वस्तीत जनमत प्रतिष्ठानतर्फे थर्मल स्कॅनिंग व औषध वाटप

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना लॉकडाऊनच्या काळात जनमत प्रतिष्ठानतर्फे विविध ठिकाणी जनसेवेच्या कामे करण्यात आली. श्रीकृष्ण लॉन परिसरातील गरीब वस्तीमध्येही काल (दि.१२) सिध्दी महिला बचत गटाच्या सहकार्याने थर्मल स्कॅनिंग व औषध वाटप करण्यात आले.
यावेळी रिद्धी महिला बचत गटाच्या अध्यक्षा चित्रा मालपाणी यांनी लॉकडाऊन काळात गरीब वस्तीमध्ये जाऊन अन्नदान करणे मेडिकल कॅम्प भरवणे सैनिक गोळ्या वाटणे असे बरेच कार्य त्यांनी केले आहेत त्यांच्या कार्याला सलाम म्हणून जनमत प्रतिष्ठान कडून डॉक्टर संजय पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.
श्री कृष्णा लॉन समोरील शिरसोली रस्त्यावरील गरीब वस्तीमध्ये सिद्धी महिला बचत गट व जनमत प्रतिष्ठान कडून तेथील राहणाऱ्या वस्तीमधील लोकांची थर्मल स्कॅनिंग चेकअप करण्यात आला तसेच त्यांना आरोग्य विषयक माहिती कोरोना विषयी जनजागृती व स्वच्छता मोहीम बाबत डॉक्टर संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले,, त्याप्रसंगी सिद्धी महिला बचत गटाच्या अध्यक्ष चित्रा मालपाणी मॅडम, डॉक्टर संजय पाटील, गुणवंत बऱ्हाटे, हर्षाली पाटील, व जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here