ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज

grampanchyat-election-khultabad

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील 25 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकासाठी खुलताबाद तहसील प्रशासन सज्ज झाले आहे.खुलताबाद तालुक्यातील एकूण 25 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाले आहे.दिनांक 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष खुलताबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील एकुण प्रभागातील 205 जागेसाठी 474 उमेदवार रिंगणात आहे.तर 36 जागा बिनविरोध आहेत.त्यात वेरूळ, मावसाळा,सोनखेडा,येथील काही प्रभागात बिनविरोध निवड झाली आहे.मतदानासाठी केंद्रीध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांची नियुक्ति होऊन त्यांची दूसरे प्रशिक्षण……(शुक्रवार)रोजी खुलताबाद येथील डॉ.ज़ाकिर हुसेन महाविद्यालयाचे सभागृहात,संपन्न झाली.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी निवडणूक अधिकारी/कर्मचारी यांना निवडणूक विषयक सर्व माहिती दिली. तसेच मतदान यंत्र याविषयी सखोल माहिती दिली व निवडणूक अधिकारी कर्मचारी यांच्या शंकाचे निरसन केले. प्रशिक्षणास गैरहजर असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या असून त्यांच्याकडून 24 तासाच्या आत लेखी खुलासा मागविण्यात आला आहे.

यावेळी संगीता सानप मॅडम, उपजिल्हाधिकारी, नायब तहसिलदार अशोक कापसे, पी.बी.गवळी,डी.पी.गोरे तलाठी, विनोद जाधव, विनेश महेर,मास्टर ट्रेनर संजय राठोड, प्रशांत जोगदंड ,लालचंद वानरे,भगवान घुसळे ,अशोक गर्गे ,विलास वाहुळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here