अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – दि.६ जाने.रोजी मुंबई मराठी पत्रकार परिषद, मुंबई तर्फे वर्धापनदिनानिमित्त तसेच, बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी म्हणजे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दिला जाणारा “जयहिंद प्रकाशन पुरस्कार”- २१ चा अनंतराव भालेराव यांचे ग्रामीण विकास पत्रकारितेतील ‘योगदान’ या प्रबंधासाठी सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी विषयावर पुस्तकाचे उत्कृष्ट लेखनाबद्दल तसेच
पत्रकारितेला उपयुक्त ठरणाऱ्या विषयासाठी डॉ. नरेंद्र कुमार विसपुते मुंबई दूरदर्शनचे सहा. संचालक आणि वृत्तसंपादक तसेच जन्मबंध तंटामुक्त समिती सदस्य यांना पत्रकार दिनी म्हणजे ६ जानेवारी प्रमुख पाहुणे चंद्रकांत वानखेडे,तसेच अध्यक्ष विश्वनाथराव वाबळे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रात उपयुक्त विषयासाठी मुंबई मराठी पत्रकार परिषदेने चांगल्या कामाची दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल परिषदेचे आभार मानले.पुरस्काराने चांगले काम करण्याची उर्जा मिळाली. असे यावेळी सांगितले.
तसेच मुंबईतील सुवर्णकार समाज तसेच जन्मबंध व्हाट्सएपच्या ग्रुपतर्फे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर मोरेसाहेब,सुनील सोनानिस,सौ आशा खरोटे, जयेशजी माडीवाले समिरजी दहिवडकर, श्याम विसपुते,रत्नाकर वडनेरे, सौ सोनाली खरोटे व श्री खरोटे आदिंनी वरळी( मुंबई दूरदर्शन) येथे जाऊन डॉ. नरेंद्रकुमार विसपुते (सहाय्यक संचालक , वृत्तसंपादक, मुंबई दूरदर्शन)यांना “जयहिंद प्रकाशन पुरस्कार-२१”मिळाल्याबद्दल श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांची प्रतिमा तसेच पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. समाजातील, नातेवाईक, मित्रमंडळी,आप्तेष्ट इ.सर्व स्तरावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







