विराट-अनुष्काच्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल

virat-anushka

नवी दिल्ली – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या घरी पाळणा हलला आहे. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने मुलीला जन्म दिला आहे. विराट कोहलीने ट्वीट करून चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने आपल्या व्हेरिफाइड इंस्टाग्राम अकाउंटवर विरुष्काच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. मात्र फोटोमध्ये मुलीचा केवळ पायाचा भाग दिसत आहे. मात्र हा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विकास कोहली यांनी लिहिले आहे, ‘आनंदाने सारं वातावरण भरलं आहे. कुटुंबात एका परीने पाऊल ठेवलं आहे.” फोटोवर विकास यांनी बरेच सारे कार्टून इमोजी बनवून वेलकम असे देखील लिहिले आहे.

विराटने मुलीच्या आगमनाची बातमी दिल्यानंतर तुम्ही समजून घ्याल की अशा वेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल, असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

‘तुमच्या प्रेम आणि मंगलकामनेसाठी सह्रदय आभारी आहोत. बाळ आणि बाळांतीण दोघेही सुखरूप आहेत’, असेही त्याने पोस्ट मध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here