जळगाव जिल्ह्यात आज आढळले २०५ कोरोना बाधित

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीचे आज (दि.१३) प्राप्त झालेल्या अहवालानुसार २०५ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढलेल्या २०५ कोरोना बाधितांमध्ये जळगाव शहरातील ५६, जळगाव ग्रामीण ९, भुसावळ १६, अमळनेर ८, चोपडा ९, पाचोरा ६, भडगाव १, धरणगाव २२, यावल ७, एरंडोल २३, जामनेर ५, रावेर ११, पारोळा १५, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर ७, बोदवड ५ व दुसऱ्या जिल्ह्यातील १ असा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ६१६७ झाली असून, आज ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित ३३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज १९८ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ३७४० रुग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान ७ जुलै ते १३ जुलै दरम्यान जिल्हाधिकारी राऊत यांच्या आदेशाने लागू झालेला लॉकडाऊन आज मध्यरात्री संपत असून, टप्प्याटप्प्याने मंगळवारपासून व्यवहार पूर्ववत सुरु होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ७ दुकाने सुरु राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here