दोडाईचा (संतोष कोळी) – सोलापूर येथील दैनिक सोलापूर भूषणचे संपादक व जेष्ठ पत्रकार विष्णू कारमपुरी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकारी /कर्मचारी यांना निलंबित करणेबाबत येथील मराठी पत्रकार असोसिएशनतर्फे नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
सोलापूर येथील दैनिक सोलापूर भूषणचे संपादक व जेष्ठ पत्रकार विष्णू कारमपुरी यांना दिनांक १०/७/२० रोजी सोलापूर येथील पार्क चौकात पोलीस वाहन तपासणी करत असताना त्यांचा मुलगा आपल्या आजारी पत्नीला दवाखान्यात घेऊन जात असताना मुलाची मोटारसायकल पोलिसांनी जप्त का केली होती याबाबत कारंमपुरी यांनी माझा मुलगा चुकला असेल तर कायदेशीर मी दंड भरण्यास तयार आहे असे म्हणतं असताना त्याठिकाणी बंदोबस्त साठी असलेल्या संबंधित पोलीस अधिकारी /कर्मचारी यांनी कारमपुरी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्यावर व त्याचा कुटूंबातील सदस्यांवर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अपमानित केले आहे या घटनेचा दोंडाईचा मराठी पत्रकार असोसिएशनचे वतीने निषेध नोंदविण्यात आले व आंदोलन करण्यात येईल अशा इशारा या प्रसंगी देण्यात आले कारमपुरी यांना मारहाणर्या करणार्या व शिवीगाळ करणाऱ्या पोलीस अधिकारी /कर्मचारी यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे असे निवेदन द्वारे दोंडाईचा मराठी पत्रकार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
जेष्ठ पत्रकार विष्णू कारंमपुरी यांना मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकारी /कर्मचारी यांना निलंबित करा अन्यथा दोंडाईचा मराठी पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्षासह याचे वतीने आंदोलन करण्यात येईल इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनची प्रत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांना प्रत रवाना करण्यात आले. मराठी पत्रकार असोशियनचे संस्थापक .अध्यक्ष संतोष कोळी, अध्यक्ष हिम्मत निकम,अख्तर शाह. प्रभाकर धनगर, रवींद्र टाटीया,संजय पाटील, पंकज पाटील, महेंद्र जैन मयूर कोळी, अनिल जाधव,महेश धनगर, प्रविण वाडीले.नरेंद्र लोहार आदी उपस्थित होते.







