मुंबई (सिध्दार्थ जाधव) – कोरोनारुपी महामारीच्या कठीण काळात आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांच्या जिवीत रक्षणासाठी कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व गृहरक्षक दलातील जवानांना कोरोना योध्दा २०२० सन्मान देऊन त्यांचे गौरव करण्याचे कार्य महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशनच्यातर्फे करण्यात येत आहे.
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवि ना वैद्य व प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ डि जाधव , धीरज पार्सेकर निवड समिती अध्यक्ष म रा, सुशील मोरे निवड समिती कार्याध्यक्ष म रा , अमोल माने प्रदेश अध्यक्ष मुंबई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कोरोनायोध्दा २०२० सन्मान वितरण पोलीस बॉईज असोसिएशन कार्यालय मुख्यालय असल्फा येथून मुंबई, घाटकोपर , अंधेरी विक्रोळी ,मुलुंड येथील प्रत्येक पोलिस स्टेशन व पोलीस चौकी नाकाबंदी येथे जाऊन पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलातील जवान तसेच शिवसेनेचे नगरसेवक किरण लांडगे, बीजेपीचे नगरसेवक सूर्यकांत गवळी, सत्यवान गवळी यांनासुद्धा कोरोना योद्धा २०२० ने सन्मानित करण्यात आले
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे विक्रोळी पोलिस स्टेशन येथे होमिओपती औषधाचे वाटप व सॅनिटायझर फवारणी प्रत्येक चौकीला सॅनिटायझर करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन घाटकोपरच्या प्रकाश शेरे ,संतोष चौगुले, जितेंद्र वर्मा , किरण सोलंकी , वासु पुजारी , रवींद्र वर्मा ,अमोल पटेकर यांनी केले या विशेष सन्मानपत्र सहभागामध्ये महिला आघाडी सौ. रिबाका लॉर्डरिक्स म रा उपाध्यक्ष, सौ. विजया बावदाने मुंबई प्रदेश अध्यक्षा यांचे विशेष योगदान लाभले
Home Uncategorized महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे पोलीस दल व गृहरक्षक दलातील जवानांचा कोरोना योध्दा...







